Achira News Logo
Achira News

ऐतिहासिक विक्रीनंतर सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा वाढ

Maharashtra Times
ऐतिहासिक विक्रीनंतर सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा वाढ
Full News
Share:

Gold Silver Price Today:सलग तीन दिवस ऐतिहासिक विक्री झाल्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी सोने आणि चांदीच्या किमतीत आता पुन्हा एकदा दरवाढीचे तुफान आले आहे. अमेरिकेसोबत सर्वात मोठी ट्रेड डीलची घोषणा झाल्यावर भारतीय बाजारातही सोने आणि चांदीच्या किमती सुस्साट वाढल्या. गेल्या आठवड्यात, गुरुवारी, सुरुवातीला दोन्ही धातूंच्या किमती सर्वकालीन उच्चांकावर पोहोचल्या होत्या, पण नंतर सलग तीन दिवस विक्रीचा सपाटा लागला, ज्यामुळे गुंतवणूकदार करणाऱ्यांचे टेन्शन वाढले.सोने-चांदीचा दर वाढता वाढेचमागील तीन दिवसांच्या सततच्या घसरणीनंतर देश-विदेशातील सराफा बाजारातपुन्हा एकदा खरेदीचा जोरवाढताना दिसत आहे. या दरम्यान, मागणी मजबूत आणि डॉलर कमकुवतच्या पार्श्वभूमीवर बुधवार, 4 फेब्रुवारी रोजी एमसीएक्सवर सकाळच्या व्यवहारात सोने आणि चांदीच्या दरात चांगली वाढ झाली. अशा स्थितीत, अलीकडच्या घसरणीत जर एखाद्याने गुंतवणूक केली नसेल तर आता नक्कीच त्यांच्यावर पश्चाताप करायची वेळ आली असेल कारण सोने-चांदीच्या दरांमधील तेजी पुढेही सुरु राहण्याचा अंदाज आहे.India-US Trade Agreement: अमेरिकेसोबत डील क्रॅक, भारताचा मास्टरस्ट्रोक; 10 अब्जोंची उत्पादने अमेरिकेत थेट फ्री... कसं समजून घ्यासलग दुसऱ्या दिवशी देशांतर्गत फ्युचर्स बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी वाढ झाली. एमसीएक्सवर व्यवहार सुरू होताच सोने 5000 रुपये आणि चांदीची किंमत किलोमागे 15000 रुपयांनी वाढली. याआधी एप्रिल सोन्याचा वायदा दर मागील सत्रात 1,53,809 रुपये प्रति 10 ग्रॅमवर क्लोज झालेला तर, आज सकाळी पाच हजारांनी वाढून 1,58,420 रुपयांवर पोहोचला आहे.Gold Investment: आनंदी आनंद गडे...ETF गुंतवणूकदार खुश, ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे फायदाच फायदात्याचवेळी, मार्च चांदीचे फ्युचर्स मागील सत्रातील 2,68,015 रुपयांवरून बुधवारी सकाळी किलोभर चांदीचा दर 2,78,015 रुपये झाला आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरच्या किंमतीत घट झाल्यामुळे बुधवारी सोन्याच्या किमतीत 2% पेक्षा जास्त वाढ झाली. या दरम्यान, मजबूत अमेरिकन मॅक्रो डेटा आणि यूएस फेडने व्याजदरांमध्ये कोणताही बदल न केल्यामुळे झालेल्या अलीकडील वाढीनंतर नफावसुलीमुळे डॉलर निर्देशांक घसरला ज्यामुळे सोने-चांदी खरेदीचा ओघ वाढला.RBI ने बँकाना दिले आदेश, सरकारी सुट्टीच्या दिवशीही बँक कर्मचाऱ्यांना करावं लागणार काम, अचानक असा निर्णय का?येन वगळता बहुतेक प्रमुख चलनांच्या तुलनेत अमेरिकन डॉलर घसरला. अशाप्रकारे, डॉलर कमजोर झाल्यावर इतर चलनांसाठी डॉलर-बेस्ड मौल्यवान धातू अधिक स्वस्त होतात. गेल्या काही दिवसांत मौल्यवान धातूंमध्ये झालेल्या ताज्या घसरणीनंतरही सोने आणि चांदीचा दर एका महिन्यात प्रत्येकी जवळपास 15% वाढला असून या दरम्यान, एका वर्षात स्पॉट गोल्डची किंमत 77% वाढली आणि चांदीने तब्बल 172% परतावा दिला.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Maharashtra Times

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

ऐतिहासिक विक्रीनंतर सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा वाढ | Achira News