Aishwarya Narkar on working in television: ऐश्वर्या नारकर यांनी आजवर अनेक चित्रपट, मालिका आणि नाटक अशा विविध माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. त्यांचा चाहतावर्ग मोठा आहे. नुकतीच त्यांनी अमोल परचुरेंच्या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी टेलिव्हिजनवर काम करण्याविषयी मत व्यक्त केले. ऐश्वर्या नारकर म्हणाल्या, “मला सगळ्या माध्यमात काम करायला मजा येते. मी फक्त नाटकच करेन किंवा फिल्मच करेन, मालिकेत काम करणार नाही असं मला करता येत नाही.” “जर मला दोन प्रोजेक्टमध्ये काम करण्यासाठी विचारले, त्यात एक फिल्म असेल आणि एक मालिका असेल. तर मला जे पात्र आवडतं, त्याला मी प्राधान्य देते. मला जर मालिकेतील पात्र आवडलं असेल तर मालिका करते. बऱ्याचजणांना असं वाटतं की टेलिव्हिजनवर काय काम करायचं. टेलिव्हिजनवर तुम्ही रोजच दिसता. त्यामुळे तुमचं महत्व कमी होतं.” पुढे त्या म्हणाल्या, “मला उलट वाटतं की तुम्ही सतत दिसत राहून तोच तोच ड्रामा तुम्ही सादर करत असलात तरी ती २० मिनिटे जिथे तुमच्या प्रेक्षकांना चॅनेल बदलण्याची संधी असते. पण तुमच्या पात्रामुळे ते तो शो पाहत असतील तर ते मला क्रेडिटेबल वाटतं. सगळ्या त्या टीमसाठीच क्रेडिटेबल आहे. कारण- डेलीसोपचं लिखाण करणं सोपं नाहीये, ते दिग्दर्शन सोपं नाहिये. सतत १२-१२ तास काम करणंही सोपं नाहीये.त्या सगळ्या परिस्थितीत तुम्ही तुमचे पात्र छान पद्धतीने साकारून लोकांपर्यंत पोहोचणं आणि तुमच्या पात्रासाठी लोकांनी तो शो बघणं हे मला छान वाटतं. मला ते खूप कमी दर्जाचं वाटत नाही.” जे लोक टेलिव्हिजन काम करणाऱ्यांची खिल्ली उडवतात, त्यांच्याबद्दल ऐश्वर्या नारकर म्हणाल्या, “ज्यांना टेलिव्हिजनवर काम करणं आवडत नाही किंवा जे म्हणतात की ते कमी दर्जाचे आहे. त्यांनी एखाद्या मालिकेत काम करुन तो अनुभव घ्यावा. टेलिव्हिजन काम करणे कठीण आहे.” “तुम्ही समाजमनात कितीही उच्च दर्जाचे असाल आणि टेलिव्हिजनवर काम करताना तुम्ही तुमच्या पात्रांतून प्रेक्षकांना थांबवू शकत असाल असं नाहीये. कारण- तिथे काम करण्याची परिस्थिती वेगळी असते. तुम्हाला दहा सीन्स करावे लागतात. आयत्या वेळी अनेकदा सीन येतात. त्यात बऱ्याचदा लोकेशनला प्राधान्य देऊन सीन्स दिले जातात. त्यामुळे स्क्रीन प्लेनुसार सीन्स नसतात. म्हणजे तुम्हाला तो घटनाक्रम मिळत नाही, तुम्हाला कल्पना करावी लागते. तर या सगळ्या पातळ्यांवर जरी पाहिलं तरी ते सोपं नाहीये आणि दुसरं असं की ते तुमच्या उदरनिर्वाहाचे साधन आहे. “ ऐश्वर्या नारकर असेही म्हणाल्या की, टेलिव्हिजन ही एका कलाकारासाठी कठीण गोष्ट आहे. मला त्याच्यात काही कमी वाटत नाही. दरम्यान, सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत ऐश्वर्या नारकर नकारात्मक भूमिकेत दिसल्या होत्या.
ऐश्वर्या नारकरने दूरचित्रवाणीवरील तिच्या कामाकडे बघण्याच्या दृष्टिकोनावर चर्चा केलीः पात्रांची निवड आणि प्रेक्षकांची व्यस्तता यावर भर
Loksatta•

Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Loksatta
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.