Cricket Catch Video: ऑस्ट्रेलियाच्या देशांतर्गत वन-डे कप (Marsh Cup) मध्ये विक्टोरिया आणि क्वीन्सलँड यांच्यातील सामन्यात टॉम रॉजर्स (Tom Rogers) याने मार्नस लाबुशेन (Marnus Labuschagne) याचा एक अविश्वसनीय झेल टिपला. क्रिकेटच्या मैदानात अनेकदा असे काही क्षण पाहायला मिळतात जे पाहून डोळ्यांवर विश्वास बसत नाही. असाच एक चित्तथरारक झेल ऑस्ट्रेलियाच्या 'वन-डे कप' मध्ये पाहायला मिळाला. विक्टोरियाच्या टॉम रॉजर्सने क्वीन्सलँडचा कर्णधार मार्नस लाबुशेनचा एक हाताने हवेत झेप घेत घेतलेला झेल सध्यासोशल मीडियावरधुमाकूळ घालत आहे. रॉजर्सचा अप्रतिम झेल क्वीन्सलँडच्या डावातील सहाव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर लाबुशेनने एक जोरदार शॉट खेळला. चेंडू अत्यंत वेगाने सीमारेषेकडे जात होता, मात्र तिथे तैनात असलेल्या टॉम रॉजर्सने आपल्या डाव्या बाजूला हवेत मोठी झेप घेतली आणि चक्क एका हाताने चेंडू टिपला. हा चेंडू इतका वेगवान होता की लाबुशेनसह मैदानावरील सर्व खेळाडू झेल पाहून अवाक झाले. या अप्रतिम झेलमुळे मार्नस लाबुशेन अवघ्या ४ धावांवर (९ चेंडू) माघारी परतला. या झेलचा व्हिडिओ cricket.com.au ने शेअर केला असून, चाहत्यांनी टॉम रॉजर्सच्या या चपळाईचे भरभरून कौतुक केले आहे. Tom Rogers with an absolute SCREAMER to dismiss Marnus 🤯Stream the#OneDayCuphere:https://t.co/RspGgYIOxcpic.twitter.com/wlPd6Cyiwm लाबुशेनच्या विकेटमुळे क्वीन्सलँडची स्थिती १७ धावांवर ३ बाद अशी बिकट झाली होती. या झेलसह टॉम रॉजर्सने आपल्या लिस्ट-ए (List-A) क्रिकेट कारकिर्दीतील १० झेल पूर्ण केले. त्याने २०२३ मध्ये आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. दरम्यान, क्वीन्सलँडचा संघ ४९ षटकांत २१५ धावांवर गारद झाला. त्यांच्याकडून जिमी पीअर्सनने सर्वाधिक ६५ धावा केल्या. विक्टोरियाकडून फिरकीपटू टॉड मर्फीने १० षटकांत २९ धावा देऊन ३ बळी घेतले. त्यामुळे विक्टोरियासमोर विजयासाठी २१६ धावांचे माफक लक्ष्य उभे राहिले.
ऑस्ट्रेलियाच्या एकदिवसीय चषक स्पर्धेत टॉम रॉजर्सच्या श्वास रोखून धरायला लावणाऱ्या एका हाताच्या झेलने क्रिकेट चाहत्यांना धक्का बसला
Lokmat•
Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.