Achira News Logo
Achira News

ओहायोच्या लोरेन तलावावर शक्तिशाली उल्कापिंडाचा स्फोट

Lokmat
ओहायोच्या लोरेन तलावावर शक्तिशाली उल्कापिंडाचा स्फोट
Full News
Share:

वॉशिंग्टन - दररोज अनेक उल्का पृथ्वीच्या वातावरणात आदळतात आणि रात्रीच्या वेळी अनेकदा तेजस्वी प्रकाशाच्या झोतांच्या रूपात दिसतात. पण मंगळवारी अमेरिकेच्या ओहायो राज्यातील क्लीव्हलँडमध्ये जे घडले त्याने स्थानिकांना चकित केले. स्थानिकांनी इथं एक मोठा आवाज ऐकला, ज्याची तुलना काहींनी एका शक्तिशाली स्फोटाशी केली. ही एक शक्तिशाली उल्का होती. याहूनही विशेष गोष्ट म्हणजे ती दिवसा दिसली, जेव्हा त्या जवळजवळ पूर्णपणे अदृश्य असतात. शेकडो किलोमीटर दूर बसलेल्या लोकांनी आगीचा गोळा पाहिल्याचे समोर आले. सकाळी ९ वाजता ही घटना घडली. अमेरिकन मेटिअर सोसायटीने सांगितले की, त्यांना विस्कॉन्सिन ते मेरीलँडपर्यंत परिसरात उल्का दिसल्याची माहिती मिळाली. अमेरिकेची अंतराळ संस्थानासाच्यामेटिओरॉइड एन्व्हायर्नमेंट ऑफिसनेही याची पुष्टी केली. ही वस्तू एक घन लघुग्रह होती, ज्याचा व्यास अंदाजे ६ फूट आणि वजन ७ टन होते. मिळालेल्या माहितीनुसार, ही वस्तू ताशी अंदाजे ७२,४०० किलोमीटर वेगाने पृथ्वीच्या वातावरणात शिरली. हा उल्कापिंड सर्वप्रथम लोरेनजवळ एरी सरोवराच्या सुमारे ८० किलोमीटरवर दिसला. वरच्या वातावरणातून जाताना तो वेगाने दक्षिण पूर्व दिशेकडे सरकला. २५० TNT इतका स्फोट ओहायोच्या सुमारे ४८ किलोमीटर उंचीवर उल्कापिंड फुटले आणि त्यातून बाहेर पडलेली ऊर्जा विनाशकारी होती. हवेत झालेल्या या स्फोटातून २५० टन टीएनटीच्या स्फोटाइतकी ऊर्जा बाहेर पडली. हे एका अत्यंत मोठ्या मिलिट्री ग्रेड स्फोटाच्या बरोबरीचे होते असंनासानेअंदाज लावला. या स्फोटातून निघालेला प्रकाश इतका प्रखर होता की वॉशिंग्टनसह अमेरिकेतील किमान १० राज्यांतील आणि कॅनडातील ओंटारियोमधील लोकांनी ते पाहिले. हे खरोखरच एका आगीच्या गोळ्यासारखे दिसत होते असं अमेरिकन मेटिअर सोसायटीचे कार्यकारी संचालक खगोलशास्त्रज्ञ कार्ल हर्गेनरोथन यांनी सांगितले. शिवाय क्लीव्हलँडमधील राष्ट्रीय हवामान सेवेच्या कर्मचाऱ्यांनीही एक मोठा स्फोट ऐकला आणि त्यांना कंपने जाणवल्याचे म्हटलं. NASA reports a 7-ton meteor broke apart over northern Ohio around 9AM local time ☄️pic.twitter.com/XGBELHJ6em पृथ्वीला धोका या उल्कापिंडाबद्दलची सर्वात चिंताजनक गोष्ट म्हणजे याबाबत कुणालाही कल्पना आली नाही. नासा आणि इतर संस्था पृथ्वीजवळून जाणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवतात पण त्यांना याचा शोध लागला नाही. या उल्कापिंडाने पृथ्वीच्या ग्रहीय संरक्षण प्रणालीला चकमा दिला आणि तो पृथ्वीत शिरला. २५० टन टीएनटीच्या स्फोटाएवढा स्फोट घडवण्यास सक्षम असलेला खडक कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय एखाद्या लोकवस्तीच्या भागावर आदळू शकतो असा भविष्यात एक धोका यामुळे निर्माण झाला आहे.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

ओहायोच्या लोरेन तलावावर शक्तिशाली उल्कापिंडाचा स्फोट | Achira News