पुणे: ‘तुझे लग्न जमू देणार नाही. तुझ्या कुटुंबीयाचा खून करेल’, यासह तिच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी येरवड्यातील लक्ष्मीनगरपोलिसांनीएका तरुणाला अटक केली. याबाबत एका २१ वर्षाच्या तरुणीने लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनीदिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणीचे आरोपीशी चार वर्ष प्रेमसंबध होते. तरुणीच्या कुटुंबीयांनी तिचे लग्न ठरविले. त्यामुळे तरुणीने त्याला प्रेमसंबंध ठेवू नको, माझे लग्न ठरले आहे, असे आरोपीला सांगितले. त्यानंतर आरोपी तरुणाने ‘तुझे लग्न जमू देणार नाही. तुझ्या कुटुंबीयाचा खून करेल’, असे म्हणत तरुणीला शिवीगाळ करुन धमकावले. तसेच आरोपीने तरुणीच्या आईला तीक्ष्ण शस्त्राचा धाक दाखवून तिला जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर आरोपी तरुणाने तरुणीचा ज्याच्याशी लग्न ठरले होते. त्याला प्रेमसंबंधाची छायाचित्रे पाठविली. नियोजित पतीने लग्न मोडले. या घटनेनंतर तरुणीने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक जगताप तपास करत आहेत.
कुटुंबाला धमकावणाऱ्या तरुणाच्या विरोधात पुण्यातील महिलेची तक्रार
Lokmat•
Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.