मुंबई : २०१९ मध्ये वडाळा ट्रक टर्मिनसपोलिसठाण्यात मुलाचापोलिसांच्याताब्यात असताना मृत्यू झाल्याने संबंधित पोलिसांवर कारवाई करावी, अशी मागणी करणारी मुलांच्या वडिलांची याचिका मुंबईउच्च न्यायालयानेफेटाळली. पोलिसांविरुद्धचे आरोप असमर्थनीय आहेत, असे म्हणत न्यायालयाने सीबीआयच्या अहवालाला मान्यता दिली. सीबीआयने पोलिसांना क्लीन चिट देण्यात आली असून ज्या व्यक्तींची मृत व्यक्तीशी झटपट झाली होती त्यांनाही मारहाणीच्या आरोपातून मुक्त करण्यात आले आहे. गेल्या सप्टेंबरमध्ये या प्रकरणाचा तपासउच्च न्यायालयानेसीबीआयकडे सोपवला. न्या. भारती डांगरे आणि न्या. मंजूषा देशपांडे यांच्या खंडपीठाने म्हटले की, सीबीआयने स्पष्टपणे निष्कर्ष काढला आहे की, मृत्यू पोलिसांकडून मारहाणीमुळे झाला नाही, तर तो अचानक आलेल्या हृदयविकाराच्या झटक्यामुळे झाला. १३ मार्च रोजी दिलेल्या निकालात न्यायालयाने नमूद केले की, सीबीआयने या प्रकरणात सर्व बाजूंनी तपास करून पोलिसांनी मारहाण केली का, याचा शोध घेतला आणि सुरुवातीपासूनच उत्तर नकारार्थी होते. कोणताही दखलपात्र गुन्हा न आढळल्याने न्यायालयाने सीबीआयच्या अहवालावर शंका घेण्याचे कारण नसल्याचे सांगत पोलिसांविरुद्धची याचिका फेटाळली. नेमके प्रकरण काय?ऑक्टोबर २०१९ मध्ये वडाळा ट्रक टर्मिनस पोलिसांनी विजय सिंग याला एका भांडणाच्या प्रकरणात ताब्यात घेतले होते. एका जोडप्याने आरोप केला होता की, तीन पुरुषांनी त्या महिलेचा लैंगिक छळ केला. या प्रकरणातील दुसरा याचिकाकर्ता निर्मल सिंग हा स्वत:ला मारहाणीचा साक्षीदार असल्याचा दावा करत होता. विजयचे वडील हृदयसिंग यांचे वकील विनय नायर यांनी असा युक्तिवाद केला की, त्यांच्या मुलाचा मृत्यू हा पोलिसांच्या क्रूर मारहाणी आणि अमानुष वागणुकीमुळे झाला. ...म्हणून याचिका दाखलट्रक टर्मिनस पोलिस ठाण्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी त्याच्या वडिलांनी याचिका दाखलकेली होती.
कोठडीत मुलाच्या मृत्यूबाबत पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली
Lokmat•

Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.