Achira News Logo
Achira News

कतारवर इराणचा हल्लाः मध्यपूर्वेतील संघर्षामुळे ऊर्जा उत्पादनावर परिणाम

Maharashtra Times
कतारवर इराणचा हल्लाः मध्यपूर्वेतील संघर्षामुळे ऊर्जा उत्पादनावर परिणाम
Full News
Share:

Iran Strike on Qatar:तुम्ही ऐकलं असेलच की दोंघांच्या भांडणात तिसऱ्याने हस्तक्षेप करू नये, पण कदाचित कतारने ही म्हण ऐकली नाही. म्हणून इराण आणि अमेरिका-इस्रायलच्या संघर्षात कतारची कोंडी होताना दिसत असून तिसरा पक्ष - कतार - ने स्वतःचेच मोठे नुकसान करून घेतले आहे. मध्यपूर्वेतील युद्धामुळे कोणाला सर्वाधिक फटका बसला असेल, तर तो कतारलाच.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आपल्या व्हाईट हाऊसमध्ये बसून इस्रायलच्या खांद्यावर हात ठेवून बंदूक चालवत आहेत. पण प्रत्यक्षात खरं नुकसान कतारचेच झाले आहे, ज्याच्या ऊर्जा उत्पादनालाइराणमुळे सर्वात मोठा फटका बसलाआहे. परिस्थिती अशी आहे की या धक्क्यामुळे कतारला पुढील काही दिवस वार्षिक सुमारे 2 लाख कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागेल, ज्याचा सर्वात मोठा परिणाम भारतावरही दिसून येईल.Stock Market: मोठ्या घसरणीनंतर शेअर बाजाराचे दणक्यात ‘कमबॅक’, युद्ध सुरुच तरीही आठवड्याच्या शेवटच्या दिवशी गुंतवणूकदारांना दिलासाइराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्याचा कतारला फटकाइराणच्या अमेरिका आणि इस्रायलसोबतच्या तणावात सर्वाधिक फटका आखाती देशांना, विशेषतः कतारला बसला आहे. इराणने अमेरिकेच्या सर्व मित्र राष्ट्रांवर हल्ल्यांची मालिका सुरू केली ज्याचा सर्वाधिक फटका कतारच्या गॅस उत्पादनाला बसला आहे. अलीकडेच बुधवारी, इराणने कतारचे 17% गॅस उत्पादन नष्ट केले ज्यामुळे पुढील पाच वर्षांसाठी कतारला दरवर्षी 2 ट्रिलियन रुपयांचे नुकसान सोसावे लागू शकते असा अंदाज आहे.युद्ध सुरू झाल्यापासून इराण अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांवर क्षेपणास्त्रे डागत असून आतापर्यंत संयुक्त अरब अमिरात, सौदी अरेबिया, कतार आणि कुवेत यांसह सर्व आखाती देशांना लक्ष्य केले आहे पण, सर्वाधिक नुकसान मात्र कतारचे झाले आहे. इराणने अलीकडेचकतारच्या एलएनजी उत्पादनाला लक्ष्यकेले ज्यामध्ये 17% गॅस उत्पादन नष्ट झालं आणि आता दरवर्षी निर्यातीत 20 अब्ज डॉलर्स किंवा अंदाजे 1.85 लाख कोटी रुपयांचे नुकसान सोसावे लागण्याचा अंदाज आहे.Gold Silver Rate 20th March 2026: एका दिवसात दर बदलले; चांदी तब्बल 7,000 रुपयांनी महाग; सोन्याच्या किमतीतही वाढकतारला इतकं नुकसान कसं झालंइराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे कतारचे रास लाफान औद्योगिक शहरातील एनर्जी ट्रेन 4 आणि 6 नष्ट झाले. कतार या दोन ट्रेनमधून वार्षिक 12.8 लाख टन गॅसचे उत्पादन करायचा, जे कतारच्या एकूण गॅस उत्पादनाच्या अंदाजे 17% होते. अशाप्रकारे, इराणच्या हल्ल्यानंतर आता त्यांची उत्पादन क्षमता पुन्हा सुरू करण्यासाठी अंदाजे पाच वर्षे लागू शकतात, असे तज्ज्ञांचे मत आहे.यादरम्यान कतारने आधीच आपलं एलपीजी उत्पादन थांबवलं आहे आणि गॅस प्लांटच्या विध्वंसामुळे नुकसानीत आणखी भर पडली असून कतारकडून गॅस खरेदी करणाऱ्या सर्व देशांवरही, विशेषतः भारतावर दूरगामी परिणाम होणे अपेक्षित आहे जो आपल्या एकूण एलपीजी वापरापैकी 60 टक्के आयात करतो आणि यापैकी 60 टक्क्यांहून अधिक आयात एकट्या कतारमधून केली जाते.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Maharashtra Times

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

कतारवर इराणचा हल्लाः मध्यपूर्वेतील संघर्षामुळे ऊर्जा उत्पादनावर परिणाम | Achira News