'गुड्डन तुमसे ना हो पायेगा' फेम लोकप्रिय अभिनेत्री कनिका मान (Kanika Mann) सध्या तिच्या एका विधानामुळे चर्चेत आली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कनिकाने तिच्या खासगी आयुष्यावर भाष्य केलं. ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. आपल्या करिअरसाठी कनिका चक्क घरातून पळून मुंबईला आली होती. कनिकाने 'हॉटरफ्लाई'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ती जेव्हा २२ वर्षांची होती, तेव्हापासून घरच्यांनी तिच्या लग्नासाठी तगादा लावला होता. कनिका म्हणाली, "माझ्या कुटुंबात मुलीचं लग्न २२ व्या वर्षी होणं योग्य मानलं जातं. १० वर्षांची असल्यापासून माझ्यावर लग्नासाठी दबाव होता. पण मला माझं करिअर घडवायचं होतं. घरचे तयार नसल्यामुळे अखेर मी एक चिठ्ठी लिहिली आणि घरातून पळून थेट मुंबई गाठली". कनिकाने खंत व्यक्त करत म्हणाली, "लहानपणापासून अभ्यासासोबतच घरातील कामं करण्यावर जास्त भर देण्यास सांगितले गेले. शाळेत जा, अभ्यास करा, पण जेवण बनवणं आणि साफसफाई करणं हे मुलींना आलंच पाहिजे, असं मला नेहमी शिकवलं गेलं". कनिकाच्या रिलेशनशिप स्टेटसवरही अनेकदा चर्चा होत असतात. मात्र, तिने सर्व अफवांना पूर्णविराम दिला आहे. ती सध्या कोणालाही डेट करत नसून कोणत्याही रिलेशनशिपमध्ये नसल्याचे तिने जाहीर केले आहे. कनिका 'खतरों के खिलाडी' आणि अनेक गाजलेल्या मालिकांनंतर आता 'नागिन ७' मध्ये दिसते आहे. विशेष म्हणजे या मालिकेत ती एका नकारात्मक भूमितेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.
कनिका मानने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलासा केला
Lokmat•

Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.