म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक:कॅप्टन अशोक खरात या ज्योतिषाकडून झालेल्या लैंगिक शोषण प्रकरणासह दाखल गंभीर गुन्ह्यांच्या चौकशीसाठी राज्य सरकारने ‘विशेष तपास पथक’ (एसआयटी) नेमले आहे. बड्या राजकीय नेत्यांच्या संपर्कात असलेल्या खरात प्रकरणाचे धागेदोरे नाशिकसह विविध जिल्ह्यांत पसरले असल्याने सरकारने उच्चस्तरीय तपासाचा निर्णय घेतला आहे. कॅप्टन खरातचा ऑफिसबॉय संशयित नीरज जाधव या प्रकरणाचा मास्टरमाइंड असल्याचा संशय असून, पुण्यातील महिला आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वात पथकाने गुरुवारी नाशिकमध्ये येऊन चौकशी सुरू केली.या प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेत सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करा, असे निर्देश पोलिस महासंचालकांना दिले आहेत. यानंतर राज्याच्या कायदा व सुव्यवस्था विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी तातडीने ‘एसआयटी’ स्थापन करीत पुणे येथील एसआरपीएफच्या बल गट क्र. एकच्या समादेशक (आयपीएस) तेजस्वी सातपुते यांना तपासाचे आदेश दिले. सातपुतेंनी गुरुवारीनाशिकमध्येदाखल होत गुन्हे शाखा युनीट एकच्या अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाची माहिती घेतली.कर्मयोगीनगरमध्ये पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली. त्यावेळी घरात सहा लाखांची रोकड मिळून आली. याशिवाय त्याच्या सिन्नरच्या फार्म हाऊसमधून पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. त्याच्यावर वावी, शिर्डी आणि सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल असून, या गुन्ह्यांची कागदपत्रे ‘एसआयटी’ने ताब्यात घेतली आहेत. कॅनडा कॉर्नर परिसरातील ‘ओजस प्रॉपर्टीज’ या कार्यालयातअशोक खरातनेअनेक महिलांवर अत्याचार केल्याचा संशय आहे. डिसेंबर २०२५ मध्ये खरातच्या ऑफिस बॉयने कार्यालयातून ५८ महिलांवरील बलात्काराचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. यानंतर त्याने खरातला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. नीरज आणि त्याच्या साथीदारांनी वादग्रस्त क्लिप्सच्या बदल्यात खरातकडे पाच कोटींची खंडणी मागितल्याचे समजते. परंतु, खरातने दाद न दिल्याने नीरजने पीडित महिलांची मदत घेण्याचा प्रयत्न केला. त्याने शिर्डीतील एका २४ वर्षीय विवाहितेचे मॉर्फ केलेले फोटो आणि व्हिडीओ तिलाच व्हॉट्सॲपवर पाठवून धमकावले. या पीडितेने खरातला कळविले. परंतु, खरातने स्वतःला वाचविण्यासाठी तिला पोलिसात जाण्यास सांगितले. खरातकडून पैसे मिळण्याची शक्यता धूसर झाल्याने नीरजने सिडकोतील २८ वर्षीय विवाहितेचा व्हिडीओ तिच्या मेहुण्याला पाठविला. मेहुण्याने पीडितेला धीर देऊन तिला सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये फिर्यादकरिता प्रोत्साहित केले.विशेष तपास पथकात नाशिक शहर आणि ग्रामीण पोलिस दलातील काही अधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी या प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रे, तांत्रिक पुरावे आणि केस डायरी एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांच्याकडे हस्तांतरित करण्याचे आदेश दिले. सातपुते यांनी तपास सुरू केल्याने पीडितांना न्याय मिळण्याच्या आशा उंचावल्या असून, या प्रकरणात आणखी काही नावे समोर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
कॅप्टन अशोक खरात यांच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणाच्या चौकशीसाठी महाराष्ट्र सरकारने विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे.
Maharashtra Times•
Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Maharashtra Times
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.