Achira News Logo
Achira News

कॅप्टन अशोक खरात विनयभंगाच्या प्रकरणाच्या चौकशीसाठी नाशिक सरकारने एस. आय. टी. ची स्थापना केली

Lokmat
कॅप्टन अशोक खरात विनयभंगाच्या प्रकरणाच्या चौकशीसाठी नाशिक सरकारने एस. आय. टी. ची स्थापना केली
Full News
Share:

Captain Ashok Kharat Case :नाशिकमधील'कॅप्टन' अशोक खरात महिला अत्याचार प्रकरणात आज एक मोठी अपडेट समोर आली आहे. 'कॅप्टन' अशोक खरात प्रकरणाची गंभीर दखल राज्य सरकारने घेतली असून, या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या पथकाचे नेतृत्व डॅशिंग पोलीस अधिकारी तेजस्विनी सातपुते यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. गुंगी आणणारं पाणी पाजून लैंगिक अत्याचार; नाशकातील स्वयंघोषित ‘कॅप्टन’ ज्योतिषी अशोक खरातला बेड्या गेल्या काही दिवसांपासून कॅप्टन खरात याच्यावर महिला अत्याचाराचे गंभीर आरोप होत होते. या प्रकरणाची व्याप्ती आणि गांभीर्य लक्षात घेता सरकारने एसआयटी स्थापन करण्याचा निर्णय घेतला. तेजस्वीनी सातपुते यांच्याकडे जबाबदारी आल्याने आता या प्रकरणाचा छडा अत्यंत वेगाने लागण्याची शक्यता आहे. खरातने यापूर्वी केलेले अन्य काही काळे कारनामे आणि त्याचे लागेबंधे आता एसआयटीच्या चौकशीत उघड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कॅप्टन खरात सध्यानाशिकक्राईम ब्रँचच्या ताब्यात असून, त्याला २४ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. कोठडीत असतानाच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आहेत. क्राईम ब्रँचच्या पथकाने खरातच्या मिरगाव येथील फार्म हाऊसवर मध्यरात्री उशिरा मोठी छापेमारी केली. या कारवाईत पोलिसांच्या हाती धक्कादायक पुरावे लागले आहेत. फार्म हाऊसच्या झाडाझडती दरम्यान पोलिसांना एक पिस्तूल सापडले आहे. यासोबतच काही वापरलेली आणि काही न वापरलेली (जिवंत) काडतुसे देखील जप्त करण्यात आली आहेत. एका अत्याचार प्रकरणात आता बेकायदेशीर शस्त्रसाठा सापडल्याने खरातच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. शस्त्रांशिवाय खरातच्या मालमत्तेचे महत्त्वाचे दस्तावेज आणि इतर काही संशयास्पद कागदपत्रेही पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. नाशिक पोलिसांनी यापूर्वीच खरातच्या घराची झडती घेतली होती. आता फार्म हाऊसवर मिळालेले पुरावे आणि एसआयटीचा तपास यातून खरातचे मोठे रॅकेट उघड होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पोलीस आता जप्त केलेल्या कागदपत्रांची आणि मालमत्तेची चौकशी करत असून, यामागे आणखी कोणाचे पाठबळ होते का, याचाही शोध घेतला जात आहे.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

कॅप्टन अशोक खरात विनयभंगाच्या प्रकरणाच्या चौकशीसाठी नाशिक सरकारने एस. आय. टी. ची स्थापना केली | Achira News