Achira News Logo
Achira News

काबूलमधील व्यसनमुक्ती केंद्रावर पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यात शेकडो ठार

Lokmat
काबूलमधील व्यसनमुक्ती केंद्रावर पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यात शेकडो ठार
Full News
Share:

पाकिस्ताननेअफगाणिस्तानचीराजधानी काबूल येथील व्यसनमुक्ती केंद्रावर हवाई हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात सुमारे ४०० जणांचा मृत्यू झाला असून २५० हून अधिक जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतरअफगाणिस्तानक्रिकेटर्संनीपाकिस्तानवरनिशाणा साधला आहे. राशीद खान आणि मोहम्मद नबी यांनी पाकिस्तानचे कृत्य योग्य नाही असे म्हटले आहे. रमजानच्या महिन्यात हे घडल्यामुळे अधिक दु:ख वाटते, अशी भावना राशीद खान याने व्यक्त केली होती. आता अफगाणिस्तानच्या युवा क्रिकेटरनं भारत खरा मित्र असल्याचे सांगत पाकिस्तानला नापाक कृत्याबद्दल चपराक मारली आहे. 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! अल्लाह गजनफरचा भावूक प्रतिक्रिया अफगाणिस्तानचा युवा फिरकीपटू अल्लाह गझनफर (Allah Ghazanfar) याने पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला, "तिथे लोकांकडे उपचारासाठी पैसेही नाहीत आणि आता त्यांनी त्या ठिकाणालाच लक्ष्य केले. अनेक निरपराध लोकांनी जीव गमावला. अफगाणिस्तानातील लोकांना हे अजिबात मान्य नाही. ते काय सिद्ध करू इच्छितात, हे मला समजत नाही. ते येतात आणि सामान्य नागरिकांना लक्ष्य करतात. आम्ही हे स्वीकारू शकत नाही.” हिटमॅन रोहित शर्माची उत्तुंग फटकेबाजी; MI च्या सराव सत्रातील व्हिडिओ व्हायरल 🚨AFGHANISTAN PLAYER SENDS EMOTIONAL MESSAGE TO INDIA.🚨- Allah Ghazanfar called India a “close friend”, saying they want to stay connected & maintain strong ties after the deadly airstrikes.His message came after the tragic incident in Kabul 🤯pic.twitter.com/oi6KqKM2L8 त्याने पुढे भारताबद्दलही भावना व्यक्त करत म्हटले, “भारत आमचा जवळचा मित्र आहे. अशा घटनांवर चर्चा करण्यासाठी आम्हाला त्यांच्याशी जोडले जावे असे वाटते, जेणेकरून भविष्यात अशा गोष्टी होऊ नयेत. इतर देशांनाही आम्ही विनंती करतो की, अशा परिस्थितीत लोकांच्या हिताचा विचार व्हावा. सध्या जग अनेक आव्हानांना सामोरे जात आहे आणि हे कोणासाठीही योग्य नाही.” आयपीएल २०२६ मध्येमुंबई इंडियन्सकडूनखेळणार अवघ्या १८ वर्षांचा असलेला अल्लाह गझनफर हा आयपीएल २०२६ च्या हंगामात पाच वेळा विजेते ठरलेल्यामुंबई इंडियन्ससंघाकडून खेळताना दिसणार आहे. मिनी लिलावाआधी मुंबई इंडियन्सने त्याला रिटेन केले होते. गजनफरने आतापर्यंत अफगाणिस्तानसाठी १ कसोटी, १४ वनडे आणि ५ टी२० सामने खेळले आहेत.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

काबूलमधील व्यसनमुक्ती केंद्रावर पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यात शेकडो ठार | Achira News