Achira News Logo
Achira News

कमी दाबाचे क्षेत्र आणि पश्चिमेकडील चक्रीवादळामुळे भारतात मोठ्या प्रमाणात गारपीट

Pudhari
कमी दाबाचे क्षेत्र आणि पश्चिमेकडील चक्रीवादळामुळे भारतात मोठ्या प्रमाणात गारपीट
Full News
Share:

गरम जमीन, थंड हवा अन्‌‍ जोरदार वाऱ्यामुळे गारपीट पुणे :राज्यातील बहुतांश भागात गत दोन दिवसांपासून गारपिटीसह पाऊस सुरू आहे. गरम जमीन, थंड हवा, जोरदार वारे यांसह कमी दाबाचा पट्टा अन्‌‍ पश्चिमी चक्रावाताचा हा परिणाम असल्याचे मत हवामान शास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहे. दरम्यान, गुरुवारप्रमाणे शुक्रवारीही बहुतांश भागांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. उत्तर भारतात पश्चिमी चक्रवात तयार झाला आहे. तसेच बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने देशातील बहुतांश भागात गारपीट, पाऊस, वादळी वारे असे पावसाळी वातावरण तयार झाले आहे. या अवकाळी पावसाचा जोर विदर्भ व मराठवाड्यात जास्त आहे. कारण या भागात हवेचा दाब कमी झाला आहे. हा पाऊस गत दोन दिवसांपासून सुरू असून शक्रवारपर्यंत सुरू राहणार आहे. या भागात वाऱ्याचा वेग ताशी 30 ते 40 कि.मी. इतका आहे. कोकण अन्‌‍ मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी आहे.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

कमी दाबाचे क्षेत्र आणि पश्चिमेकडील चक्रीवादळामुळे भारतात मोठ्या प्रमाणात गारपीट | Achira News