Achira News Logo
Achira News

कामाच्या ठिकाणी अनपेक्षित प्रसूतीः फेडेक्स कर्मचाऱ्याने बाथरूममध्ये बाळाला जन्म दिला

Lokmat
कामाच्या ठिकाणी अनपेक्षित प्रसूतीः फेडेक्स कर्मचाऱ्याने बाथरूममध्ये बाळाला जन्म दिला
Full News
Share:

या जीवसृष्टीत जेव्हा एखाद्या जीवाला गर्भधारणा होते, तेव्हा त्यात बरेच छोटे-मोठे शारीरीक बदल होत असतात. जीवांच्या जातीप्रमाणे गर्भधारणेचा ठरावीक काळही असतो. मानवाच्या बाबतीत हा काळ साधारणपणे ९ महिन्यांचा असतो. या गर्भधारणा काळमहिलांमध्येकाही अपरिहार्य बदल होत असतात. मात्र, अमेरिकेतील आयोवा येथून एक आश्चर्य चकित करणारी घटना समोर आली आहे. येथील 'फेडएक्स' नावाच्या कंपनीत कार्यरत असलेल्या एका महिलेने, कंपनीतच एका गोंडस मुलाला जन्म दिला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, आपण गर्भवती आहोत याची साधी कल्पनाही तिला नव्हती. नेमकं प्रकरण काय? -केसीसीआय आणि केईएनएस या स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, एमीथिस्ट ब्लूमबर्ग असे यामहिलाकर्मचाऱ्याचे नाव आहे. संबंधित महिलेने दिलेल्या माहितीनुसार, ती सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास आपली शिफ्ट संपवत असताना बाथरूमला गेली. यावेळी, तिला अचानकच असह्य वेदना होऊ लागल्या. यानंतर काही क्षणांतच बाळाचे डोके बाहेर आल्याचे दिला जाणवले. तिने कसा-बसा बाथरूमचा दरवाजा उघडला आणि मदतीसाठी हाक दिली. यानतंर, जॉनस्टन-ग्राइम्स फायर डिस्ट्रिक्टच्या टीमने घटनास्थळी पोहोचून तिची सुरक्षित प्रसूती केली. यानंतर बाळाला आणि त्याच्या आईला रुग्णालयात हलवण्यात आले. सध्या आई आणि मुलगा दोघेही सुखरूप असून तिने मुलाचे नाव 'ओनिक्स किंग ईस्टरली' ठेवण्यात आले आहे. एमीथिस्ट आधीच एका मुलाची आई आहेत. पहिल्या वेळेस तिला गर्भधारणेची सर्व सामान्य लक्षणे जाणवली होती. मात्र यावेळी ती तिला जाणवली नाही. तिचे वजन वाढण्याऐवजी कमी होत गेले. "मला केवळ प्रसूतीदरम्यान पाठदुखी सुरू झाली आणि बाळ खाली सरकल्यावरच त्याच्या हालचाली जाणवल्या," असे तिने सांगितले. आपल्या मुलाला तिने गमतीने 'आमचा फेडएक्स बेबी' असेही म्हटले आहे. खरे तर, अशा प्रकारची ही पहिलीच घटना नाही, तर यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत. काही आठवड्यांपूर्वी इलिनॉयमधील मेलानी स्मिथ या २८ वर्षीय महिलेला ख्रिसमसच्या दिवशी अचानकच एका मुलाला जन्म दिला होता.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

कामाच्या ठिकाणी अनपेक्षित प्रसूतीः फेडेक्स कर्मचाऱ्याने बाथरूममध्ये बाळाला जन्म दिला | Achira News