कॅन्सरसाठीच्या १७ औषधांवरील व ७ गंभीर - दुर्मिळ आजारांसाठीच्या औषधांवरील करात घट केली.प्रत्येक जिल्ह्यात मुलींसाठीच्या एका नवीन हॉस्टेलची स्थापना होईल. कंटेनर उत्पादन क्षमता वाढवणार. मेगा टेक्सटाईल पार्क्सची स्थापना करण्यात येईल. शहरांमध्ये आर्थिक क्षेत्रे विकसित केली जाणार आहेत. डेटा सेंटर तयार करणाऱ्या कंपन्यांना कर सवलत देण्यात येणार आहे. ज्यामुळे परदेशी गुंतवणूक आकर्षित होईल आणि भारत डिजिटल अर्थव्यवस्थेचा हब बनेल. या सर्व घोषणा पाहता "हा एक प्रगतीशील अर्थसंकल्प असून तो भारतीय अर्थव्यवस्थेच्या प्रत्येक क्षेत्रावर लक्ष केंद्रित करतो. स्थानिक पातळीवरील कौशल्य वाढीसाठी, २० ठिकाणी १०,००० मार्गदर्शकांसाठी १२ आठवड्यांच्या हायब्रिड ट्रेनिंग कोर्ससह पायलट योजना राबवली जाईल. पर्यटनासाठी डिजिटल ढांचा तयार करण्यासाठी, सर्व सांस्कृतिक, धार्मिक आणि वारसा स्थळांचे राष्ट्रीय डिजिटल नॉलेज ग्रिड तयार केले जाईल, ज्यामुळे स्थानिक संशोधक, इतिहासकार, कंटेंट क्रिएटर्स आणि तंत्रज्ञान भागीदारांसाठी नोकऱ्या निर्माण होतील.
कर कपात आणि पायाभूत सुविधा विकासाद्वारे अर्थव्यवस्थेला चालना देण्याचे भारताच्या प्रगतीशील अर्थसंकल्पाचे उद्दिष्ट
Pudhari•

Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.