Achira News Logo
Achira News

कराडमध्ये घरफोड्या आणि ऑटो रिक्षा चोरीप्रकरणी पुण्यातील दोघांना अटक

Pudhari
कराडमध्ये घरफोड्या आणि ऑटो रिक्षा चोरीप्रकरणी पुण्यातील दोघांना अटक
Full News
Share:

कराड :कराड शहर व परिसरात रिक्षा चोरीसोबत 9 वेगवेगळ्या ठिकाणी घरफोडी करणाऱ्या पुण्यातील दोघा संशयितांना अटक करण्यात आली आहे. यात एका महिलेचा समावेश असून एका अल्पवयीन मुलाचा सहभाग असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कराड शहर पोलिसांनी संशयितांकडून सुमारे 13 लाख 30 हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून सोन्याचे दागिने, रिक्षा, मोटरसायकल व इतर मुद्देमाल याचा यात समावेश आहे. रोहन सनी लोंढे (वय 22, रा. भारतनगर, पिंपरी पुणे) आणि तेजस्विनी अविनाश पाटील (वय 19, वाकड पुणे) अशी संशयितांची नावे आहेत. दोन्ही संशयित एकत्रित वास्तव्यास होते अशी माहिती चौकशीतून समोर आली आहे.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

कराडमध्ये घरफोड्या आणि ऑटो रिक्षा चोरीप्रकरणी पुण्यातील दोघांना अटक | Achira News