- तेजस पुराणिकनाशिक :जिल्ह्यातीलकृषी क्षेत्रात(Agriculture Department) आता आधुनिक तंत्रज्ञानाची लाट आली असून,'ड्रोन शेती'ही (Drone Farming) त्यातील एक क्रांतिकारी संकल्पना ठरत आहे. पारंपरिक औषध फवारणी व खते छिपणीसाठी ज्या ठिकाणी अधिक श्रम आणि वेळ लागतो, तिये आता ड्रोनचा वापर करून अचूक आणि जलदशेतीकरणे शक्य झाले आहे. शेतीतआधुनिक तंत्रज्ञानाची भर घालणारी 'ड्रोन शेती' ही संकल्पना आतानाशिक जिल्ह्यात(Nashik District) वेगाने रुजत आहे. पारंपरिक पद्धतीपेक्षा अधिक कार्यक्षम आणि अचूक असा हा पर्याय असून, अनेक तरुण व प्रगतशील शेतकऱ्यांनी या नवकल्पनेला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. डोन शेती म्हणजे डोनच्या साह्याने पिकांवर खते व कीडनाशके फवारणे, पीक सर्वेक्षण करणे, जमिनीचे मोजमाप करणे, अशी कामे केली जातात. या पद्धतीत अचूक आणि सम प्रमाणातील फतारणीमुळे उत्पादनाचा दर्जा टिकतो आणि खर्चात मोठी बचत होते. विषारी औषधांपासून सुरक्षितताड्रोन शेतीचे स्वरूप अत्यंत सोपे असून, यामध्ये जीपीएस यंत्रणेसह उडणाऱ्या ड्रोनद्वारे पिकांवर हवे तेवढे औषध मोजक्यापणे फवारता येते. यामुळे औषधांचा अपव्यय होत नाही, वेळ व मजुरीची बचत होते, शिवाय शेतकऱ्यांना विषारी औषधांपासून सुरक्षितताही मिळते. या तालुक्यात होतो उपयोगपिंपळगाव बसवंतसह निफाड तालुक्यातील शेतकरी ड्रोन शेतीचा अवलंब करत आहेत. टोमॅटो आणि मका पिकांमध्ये ड्रोनच्या मदतीने औषधे व जैविक खते फवारली जातात. ड्रोन शेतीच्या साहाय्याने शेतकऱ्यांना मदत होत आहे. उत्पादनात वाढ होत असल्याने तंत्रज्ञाचा वापर वाढला आहे. ड्रोन वापरण्याचे फायदे ड्रोनच्या साह्याने आम्ही १० एकर टोमॅटो व २५ एकर मका पिकावर औषध फवारणी करतो. शासनाकडून मिळणाऱ्या ५० टक्के सबसिडीमुळे ड्रोन खरेदी सुलभ झाली आहे. भाडेतत्त्वावर पाचशे रुपये प्रतिएकर दराने याचा चांगला उपयोग करता येतो. एक एकरसाठी केवळ ४० लिटर पाण्याची गरज असते. मजुरी व अन्य खर्चात बचत होत असल्याने भविष्यात शेतकऱ्यांचा कल ड्रोन शेतीकडे वाढेल, अशी खात्री आहे.- समाधान साठे, शेतकरी, पालखेड मिरची, पिंपळगाव बसवंत
कार्यक्षम आणि अचूक शेतीसाठी नाशिक जिल्ह्याने ड्रोन शेतीचा स्वीकार केला
Lokmat•

Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.