Achira News Logo
Achira News

कार्लोस अल्काराझने ऑस्ट्रेलियन ओपन पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले, कारकिर्दीतील ग्रँड स्लॅम पूर्ण केले

Sakal
कार्लोस अल्काराझने ऑस्ट्रेलियन ओपन पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले, कारकिर्दीतील ग्रँड स्लॅम पूर्ण केले
Full News
Share:

ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेला रविवारी (१ फेब्रुवारी) नवा विजेता मिळाला आहे. रविवारी ऑस्ट्रेलियन ओपन २०२६ स्पर्धेतील पुरुष एकेरीचे विजेतेपद स्पेनच्या २२ वर्षीय कार्लोस अल्काराजने दिग्गज नोवाक जोकोविचला पराभूत करत मिळवले आहे.हे त्याचे एकूण सातवे ग्रँडस्लॅम विजेतेपद असले, तरी पहिलेच ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद (Australian Open) आहे. त्यामुळे त्याने पहिल्यांदाच करियर ग्रँडस्लॅमही (Career Grand Slam) पूर्ण केले आहे.ज्यावेळी चारही ग्रँडस्लॅम स्पर्धा कारकि‍र्दीत जिंकल्या जातात त्याला करियर ग्रँडस्लॅम म्हटलं जातं. अल्काराजने (Carlos Alcaraz) फ्रेंच ओपन (२०२४, २०२५), विम्बल्डन (२०२३, २०२४) आणि अमेरिकन ओपन (२०२२, २०२५) या ग्रँडस्लॅम स्पर्धा प्रत्येकी दोनदा जिंकल्या आहेत.पण ऑस्ट्रेलियन ओपनही आता त्याने जिंकल्याने तो ओपन एरामधील करियर ग्रँडस्लॅम पूर्ण करणारा सर्वात युवा खेळाडू ठरला आहे.तसेच पुरुष एकेरीत करियर ग्रँडस्लॅम पूर्ण करणारा सहावाच खेळाडू ठरला. यापूर्वी रॉड लेव्हर, आंद्रे अगासी, रॉजर फेडरर, राफेल नदाल आणि नोवाक जोकोविच यांनीच असा कारनामा केला आहे.अव्वल मानांकित अल्काराजने ३८ वर्षीय जोकोविचला (Novak Djokovic) रविवारी अंतिम सामन्यात २-६, ६-२, ६-३, ७-५ अशा चार सेटमध्ये पराभूत केले. त्यामुळे जोकोविचची २५ व्या ग्रँडस्लॅमची प्रतिक्षा अद्यापही कायम राहिली. हा अंतिम सामना तीन तास दोन मिनिटे चालला. या सामन्यासाठी स्पेनचा दिग्गज टेनिसपटू राफेल नदालही उपस्थित होता.या अंतिम सामन्यात जोकोविचने सुरुवात चांगली केली होती. त्याने पहिल्याच सेटमध्ये अल्काराजवर वर्चस्व ठेवत विजय मिळवला होता. मात्र अल्काराजने हार न मानता दणक्यात पुनरागमन केले. त्याने दुसऱ्या सेटमध्ये दोनदा जोकोविचची सर्विस ब्रेक केली. त्यामुळे त्याने दुसरा सेट ६-२ ने सहज जिंकला आणि बरोबरी साधली.तिसर्‍या सेटमध्येही अल्काराज चांगल्या लयीत दिसला. तो बिलकूलच थकल्यासारखा दिसत नव्हता. जोकोविच शॉट्लवर त्याच्याकडे प्रत्युत्तर होते. चौथ्या गेममधील पहिल्या पाँइंटने सर्वांनाच चकीत केले. त्याने नेटजवळील जोकोविचच्या शॉट अफलातून परतवला. अल्काराजने हा सेटही जिंकत आघाडी घेतली.मात्र चौथ्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये अटीतटीचा खेळ पाहायला मिळाला. ५-६ अशा फरकानंतर मात्र अल्काराजने अखेरचा गेम जिंकून चौथा सेटही जिंकला आणि विजेतेपदावरही नाव कोरले.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Sakal

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

कार्लोस अल्काराझने ऑस्ट्रेलियन ओपन पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले, कारकिर्दीतील ग्रँड स्लॅम पूर्ण केले | Achira News