Achira News Logo
Achira News

कोल्हापूरमध्ये बी. एस. एन. एल. च्या कार्यालयात चोरी, 7 कोटी 18 लाखांचे साहित्य चोरले

Lokmat
कोल्हापूरमध्ये बी. एस. एन. एल. च्या कार्यालयात चोरी, 7 कोटी 18 लाखांचे साहित्य चोरले
Full News
Share:

कोल्हापूर: न्यू शाहूपुरी येथील संचार कॉलनीतबीएसएनएलच्याबंद कार्यालयातून सात कोटी एक लाख ८६ हजार रुपयांचे टॉवरचे साहित्य चोरट्याने लंपास केले. हा प्रकार १४ ते १५ फेब्रुवारी २०२६ दरम्यान घडला. याबाबतबीएसएनएलचेअधिकारी रविकांत शेषनारायण ओझा (४४, सध्या रा. ताराबाई पार्क,कोल्हापूर, मूळ रा. बिहार) यांनी बुधवारी (दि. १८) शाहूपुरीपोलिसठाण्यात फिर्याद दिली.शाहूपुरीपोलिसांनीदिलेल्या माहितीनुसार, बीएसएनएल कंपनीच्या मोबाइल टॉवरचे काही साहित्य संचार कॉलनी येथील एका बंद कार्यालयात ठेवले होते. चोरट्यांनी खिडकीचे लोखंडी गज कापून आत प्रवेश केला. आतील लाकडी कपाटाचे कुलूप तोडून कंट्रोलकार्ड, ऑप्टिकल मॉड्युलर, आरसीए कार्ड असे साहित्य लंपास केले.हा प्रकार दोन दिवसांपूर्वी निदर्शनास आला. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने व्यवस्थापक ओझा यांनी फिर्याद दिली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने चोरट्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक आकाश जाधव करीत आहेत.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

कोल्हापूरमध्ये बी. एस. एन. एल. च्या कार्यालयात चोरी, 7 कोटी 18 लाखांचे साहित्य चोरले | Achira News