रस्त्याच्या कडेला कार थांबलेली आहे. बाजूलावाहतूक पोलीसउभा आहे. तो कारमधील माणसाजवळ येतो आणि त्यांच्या बोलणं सुरू आहे, असे सगळं दिसत असलेला एक व्हिडीओसोशल मीडियावरव्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाठीमागे उभ्या असलेल्या कारमधील लोकांनी चित्रित केला. व्हिडीओ शेअर करणाऱ्याने दावा केला की, सीट बेल्ट नसल्यामुळे पोलिसाने कार थांबवली. पण, त्याने थेट लाच मागितली. गुजरातच्या कार चालकाने सीमेवरमहाराष्ट्रपोलिसांना उघड पाडलं आहे. व्हिडीओ शेअर करताना म्हटले आहे की, सीटबेल्ट नसल्याने पोलिसांनी कार थांबवली. पण, त्याने ५०० रुपये देण्याची मागणी केली. त्यासाठी चालकाला चलनही दिले गेले नाही. Gujarat driver exposes Maharashtra cops at state border: stopped for no rear seatbelt (₹1000 fine), but cops demand ₹500 "compromise" cash, no official challan issued!pic.twitter.com/pWhJxZ2lBI एका यूजरने म्हटले आहे की, नक्कीच याची सीमेवर दारू पकडली गेली असेल, तेव्हा याने त्यांना उघड पाडलं. रोख रक्कम जिथे येते तिथे कायद्याचे राज्य संपते. एका यूजरने म्हटले आहे की, मला हे प्रत्येक टोल आणि नाक्यावर हफ्ता वसूल करताना दिसतात. हा व्हिडीओ इतर काही लोकांनीहीसोशल मीडियावरशेअर केला आहे. यावर पोलिसांकडून कोणतीही प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही.
गुजरात चालकाने महाराष्ट्र पोलिसांचा पर्दाफाश केलाः दंड भरण्याऐवजी लाच मागितली
Lokmat•

Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.