सूरत - गुजरात पोलिसांनी बनावट नोटांविरोधात सुरू केलेल्या मोहिमेत अहमदाबाद क्राइम ब्रांचने मोठा खुलासा केला आहे. सूरत येथे बनावट नोटा चालवणारे मोठे रॅकेट पोलिसांनी उद्ध्वस्त केले. यात २ कोटीहून अधिक बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. त्याशिवाय ६ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे हा संपूर्ण कारनामा एका आध्यात्मिक आश्रमातून उघड झाला आहे. या तपासात समोर आले की, सूरतच्या कामरेज तालुका येथील श्री सत्य योग फाऊंडेशन आश्रमात बनावट नोटा छापण्याचा काळा कारनामा सुरू होता. बाहेरून धर्म आणि योग केंद्र दिसणाऱ्या आश्रमात आतमधून देशाच्या अर्थव्यवस्थेला कमकुवत करणारा प्रकार सुरू होता. क्राइम ब्रांचला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. सूरत येथून अहमदाबादला बनावट नोटांची वाहतूक केली जाणार होती. त्यानंतर पोलिसांनी या गुन्ह्यात एका महिलेसह ६ जणांना अटक केली. त्यांच्या जवळून ५०० रूपये किंमतीच्या ४० हजाराहून अधिक बनावट नोटा जप्त केल्या. ज्याची एकूण किंमत २ कोटी असल्याचे बोलले जाते. ५०० रुपये द्या आणि त्याच्या तिप्पट बनावट नोटा घ्या या बनावट नोटा सुरतच्या वराछा परिसरात छापण्यात आल्या होत्या आणि त्या चलनात आणण्यासाठी एक विशिष्ट योजना आखण्यात आली होती. ५०० खऱ्या नोटा द्या आणि १५०० बनावट नोटा घ्या अशी स्कीम असल्याचे तपासात उघड झाले. याचा अर्थ ६६ लाख खऱ्या नोटांच्या बदल्यात २ कोटी रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणल्या जात होत्या. मात्र पोलिसांनी सापळा रचत पहिल्याच व्यवहाराआधी आरोपींना अटक केली. दरम्यान, क्राइम ब्रांचच्या पथकाने सुरतमधील आश्रम आणि इतर ठिकाणी छापा टाकून प्रिंटिंग मशीन, कॉम्प्युटर, विशेष कागदे, रंग आणि अनेक महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली. या नेटवर्कमध्ये आश्रमाच्या वाहनांचाही वापर केला जात होता. पंचनामा करताना ४०,००० हून अधिक नोटांचे अनुक्रमांक नोंदवण्यासाठी पोलिसांना तासनतास संघर्ष करावा लागला.
गुजरात पोलिसांनी सुरतमध्ये बनावट नोटांच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला, 2 कोटींहून अधिक बनावट नोटा जप्त केल्या
Lokmat•

Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.