Achira News Logo
Achira News

गडचिरोली पोलिसांनी ऐतिहासिक कामगिरी केली, दुर्गम भागातील नक्षलवाद्यांच्या ताब्यात प्रवेश केला

Lokmat
गडचिरोली पोलिसांनी ऐतिहासिक कामगिरी केली, दुर्गम भागातील नक्षलवाद्यांच्या ताब्यात प्रवेश केला
Full News
Share:

लोकमत न्यूज नेटवर्क‎गडचिरोली:नक्षलवाद्यांचा शेवटचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या आणि अतिशय दुर्गम असलेल्या भामरागड तालुक्यातील 'बंगाडी' परिसरातगडचिरोलीपोलिसांनी १९ मार्च रोजी ऐतिहासिक कामगिरी फत्ते केली. तब्बल १००० सी-६० कमांडोंच्या फौजेसह पोलिसांनी अवघ्या २४ तासांत या नक्षल गडात शिरून 'पोलीस मदत केंद्रा'चा गुढी उभारण्यात आली. या मोहिमेमुळे नक्षलवाद्यांची कोंडी झाली असून, छत्तीसगड सीमेवर आता 'खाकी'ची अभेद्य भिंत उभी राहिली आहे.‎​गेल्या अनेक वर्षांपासून बंगाडी हा भाग सुरक्षा दलांच्या आवाक्याबाहेर होता. या 'सुरक्षा पोकळी'चा फायदा घेतनक्षलवादीयेथे आपली समांतर सत्ता चालवत असत. मात्र, पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या नेतृत्वाखाली आखलेल्या 'प्लॅन ११' नुसार, लाहेरीपासून ८ किमी अंतरावर असलेल्या या गावात गुरुवारी पहाटेच कमांडोंनी एन्ट्री केली. १८ बीडीडीएस पथके आणि ५०० विशेष पोलिस अधिकाऱ्यांच्या मदतीने अवघ्या एका दिवसात या ठिकाणी १५ पोर्टा कॅबिन, वाय-फाय आणि मोबाईल टॉवर उभारून प्रशासनाने आपले अस्तित्व सिद्ध केले. ३१ मार्च पर्यंत माओवाद हद्दपार करण्यासाठी पोलिस यंत्रणा जोमाने कामाला लागल्याचे दिसून येत आहे.‎काय आहे या 'मोहिमे'चे वैशिष्ट्य? ‎​बंगाडी केंद्रामुळे आता छत्तीसगडला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामातील सर्वात मोठा अडथळा दूर झाला आहे. या केंद्रामुळे नक्षलवाद्यांच्या हालचालींवर आता चोवीस तास वॉच राहणार आहे. गुंडेनूर नाल्यावरील पुलाचे काम आणि भविष्यात येथे एसटी बस पोहोचवण्याचा निर्धार पोलिसांनी व्यक्त केला आहे.‎​‎स्थानिकांना साहित्य वाटप ‎​केवळ चौकी उभारून पोलिस थांबले नाहीत, तर त्यांनी स्थानिक आदिवासींशी संवाद साधला. आयोजित जनजागरण मेळाव्यात साड्या, भांडी, ब्लँकेट आणि तरुणांना फुटबॉल-क्रिकेटच्या किटचे वाटप करण्यात आले. माओवाद्यांच्या दहशतीखाली असलेल्या गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर आता विकासाची नवी आशा फुलली आहे.‎​"बंगाडी पोलिस मदत केंद्र हे या भागातील विकासाचे प्रवेशद्वार आहे. रस्ते, पूल आणि मोबाईल नेटवर्कच्या माध्यमातून हा भाग आता जिल्ह्याच्या मुख्य प्रवाहाशी जोडला जाईल."‎- नीलोत्पल, पोलिस अधीक्षक, गडचिरोली.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

गडचिरोली पोलिसांनी ऐतिहासिक कामगिरी केली, दुर्गम भागातील नक्षलवाद्यांच्या ताब्यात प्रवेश केला | Achira News