Achira News Logo
Achira News

गुढीपाडवा हवामानाचा इशाराः राज्यभरात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा

Lokmat
गुढीपाडवा हवामानाचा इशाराः राज्यभरात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
Full News
Share:

Gudi Padwa Weather Alert : गुढीपाडवा आणि चैत्र नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर राज्यभरात हवामानाने अचानक पलटी घेतली असून शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांसाठी चिंता वाढवणारी परिस्थिती निर्माण झाली आहे.(Gudi Padwa Weather Alert) भारतीय हवामान विभाग (IMD) ने पुढील २४ तासांसाठी राज्यातील तब्बल २९ जिल्ह्यांना यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.(Gudi Padwa Weather Alert) राज्यभरात वादळी पावसाचा इशारा पश्चिमी विक्षोभ (Western Disturbance) सक्रिय झाल्यामुळेमहाराष्ट्रातीलवातावरण ढगाळ झाले असून आज (गुरुवार) वादळ, विजांचा कडकडाट आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. काही भागांत ताशी ३० ते ५० किमी वेगाने वारे वाहणार असून गारपीटही होऊ शकते. कोकणातवादळी वारे आणि पावसाची शक्यता कोकणकिनारपट्टीत आज वादळी वातावरण राहणार आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस ताशी ३०–५० किमी वेगाने वारे मुंबईसह काही भागांत ढगाळ वातावरण मध्यमहाराष्ट्रातअवकाळी पावसाचा फटका मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर येथे वादळासह पाऊस ताशी ४०–६० किमी वेगाने वारे घाट भागात जोरदार सरींची शक्यता अहमदनगरला ऑरेंज, इतर जिल्ह्यांना यलो अलर्ट उत्तर महाराष्ट्रात गारपीटीचा धोका उत्तर महाराष्ट्रात परिस्थिती अधिक गंभीर राहण्याची शक्यता आहे. नाशिक, जळगाव येथे ऑरेंज अलर्ट धुळे, नंदूरबार येथे यलो अलर्ट ताशी ५०–६० किमी वेगाने वारे विजांचा कडकडाट आणि गारपीट होण्याची शक्यता मराठवाड्यात २४ तास धोक्याचे मराठवाड्यातही अवकाळी पावसाचे संकट गडद झाले आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड – ऑरेंज अलर्ट हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव – यलो अलर्ट वादळी पाऊस, गारपीट आणि ताशी ५०–६० किमी वेगाने वारे विदर्भातहीअवकाळी पावसाचा इशारा विदर्भातपुढील ४८ तास महत्त्वाचे ठरणार आहेत. नागपूर, अमरावतीसह बहुतांश जिल्ह्यांना यलो अलर्ट ताशी ४०–५० किमी वेगाने वारे गारपीट आणि पावसाची शक्यता तापमान ३६ ते ४१ अंशांच्या दरम्यान रब्बी पिकांना मोठा फटका हिंगोली जिल्ह्यातील वसमत आणि कळमनुरी भागात झालेल्या वादळी पावसामुळे रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. गव्हाचे पीक आडवे पडले केळी व फळबागांचे नुकसान काढणीस आलेल्या पिकांवर संकट हे ही वाचा सविस्तर :Marathwada Irrigation Project : मराठवाड्याच्या दुष्काळावर मोठा उपाय; ३ सिंचन प्रकल्पांनी बदलणार चित्र! अधिक वाचा :Maharashtra Weather Update : हिटवेव्ह की अवकाळी? 'या' भागांत पावसाचा यलो अलर्ट वाचा सविस्तर

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

गुढीपाडवा हवामानाचा इशाराः राज्यभरात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा | Achira News