Achira News Logo
Achira News

'ग्लोरी'नेटफ्लिक्स मालिका प्रचंड यशस्वी ठरली, अलीकडील इतर चित्रपटांना मागे टाकले

Lokmat
'ग्लोरी'नेटफ्लिक्स मालिका प्रचंड यशस्वी ठरली, अलीकडील इतर चित्रपटांना मागे टाकले
Full News
Share:

ओटीटी प्लॅटफॉर्मवर नुकतीच प्रदर्शित झालेली एक नवी वेब सीरिज सध्या प्रचंड चर्चेत आहे. नेटफ्लिक्सवर आलेली ही सीरिज अवघ्या काही दिवसांतच नंबर-१ ट्रेंडिंग ठरली असून इतर नव्या सीरिजनाही मागे टाकलं आहे. ही ७ एपिसोड्सची सीरिज असून प्रत्येक भाग प्रेक्षकांना खिळवून ठेवतो आहे. या सीरिजला IMD वर ७.१ रेटिंग मिळालं आहे. क्राइम, मिस्ट्री आणि थ्रिलने भरलेली ही स्पोर्ट्स ड्रामा सीरिज आहे. विशेष म्हणजे, या सीरिजने दोन आठवड्यांपासून टॉपवर असलेल्या If Wishes Could Kill या साऊथ कोरियन थ्रिलरला मागे टाकलं आहे. या सीरिजचं नाव आहे Glory. हरियाणाच्या पार्श्वभूमीवर आधारित ही कथा दोन भावांभोवती फिरते. या कथेत देव (दिव्येंदु शर्मा) आणि रवि (पुलकित सम्राट) हे दोन विभक्त भाऊ बहिणी गुडिया (जन्नत जुबैर) वर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याचं आणि तिच्या बॉक्सर प्रियकर निहाल सिंगच्या हत्येचं गूढ उलगडण्यासाठी घरी परततात. या तपासादरम्यान त्यांना अनेक धोक्यांना सामोरं जावं लागतं. ही कथा सूड, नात्यांमधील गुंतागुंत आणि ऑलिम्पिकमध्ये जाण्याच्या स्वप्नाभोवती फिरते. शेवटचा क्लायमॅक्स इतका थरारक आहे की प्रेक्षक थक्क होतात. १ मे रोजी प्रदर्शित झालेल्या या सीरिजमध्ये दिव्येंदु शर्मा, पुलकित सम्राट, सुविंदर विक्की, आशुतोष राणा, सायानी गुप्ता, जन्नत जुबैर आणि कुणाल ठाकुर यांसारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. सध्या ही सीरिज नेटफ्लिक्स वर स्ट्रीम होत असून, अवघ्या काही दिवसांतच तिने ट्रेंडिंग लिस्टमध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

'ग्लोरी'नेटफ्लिक्स मालिका प्रचंड यशस्वी ठरली, अलीकडील इतर चित्रपटांना मागे टाकले | Achira News