Achira News Logo
Achira News

गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी पेडणे येथील शैक्षणिक संस्थांना भेट दिली

Lokmat
गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी पेडणे येथील शैक्षणिक संस्थांना भेट दिली
Full News
Share:

लोकमत न्यूज नेटवर्क, पेडणेतुये येथील आत्मविश्वास विद्यालयाला दिलेल्या भेटीत मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंतयांनी विशेष मुलांशी संवाद साधत त्यांच्या अभ्यासपद्धती, दैनंदिन उपक्रम व प्रगती यांची माहिती घेतली. शिक्षकांकडून आलेल्या सूचना व समस्या ऐकून त्या सोडवण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री सावंत यांनी दिली. तुये हॉस्पिटलच्या उद्घाटनानंतर मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंतयांनी येथील विशेष मुलांचे 'आत्मविश्वास विद्यालय' तसेच पेडणे येथील शासकीय उच्च माध्यमिक विद्यालयाला भेट देत शैक्षणिक व्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी आमदार जीत आरोलकर हेही उपस्थित होते. मुख्यमंत्री व आमदार जीत आरोलकर यांनी पेडणेतील शासकीय उच्च माध्यमिक विद्यालयाला भेट दिली. येथे सुरू असलेल्या दुरुस्ती कामांचा आढावा घेत वाचनालयाची स्थिती, शाळेतील सुविधा तसेच शिक्षक व विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत मुख्याध्यापकांकडून माहिती घेतली. शैक्षणिक संस्थांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शासन आवश्यक ते सहकार्य करेल, असे आश्वासन दिले. आवश्यक सुविधांवर भर काही विशेष मुले सर्वसाधारण मुलांप्रमाणे प्रगती करत असून, त्यांना पुढील शिक्षणासाठी मुख्य प्रवाहातील शाळांमध्ये समाविष्ट करण्याबाबतही मुख्यमंत्र्यांनी शिक्षकांना सूचना केल्या. विशेष मुलांच्या आरोग्याची काळजी, सुरक्षितता तसेच आवश्यक सुविधा पुरवण्यावर सरकारचा भर राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. नव्या इमारतीचा प्रस्ताव यावेळी शिक्षिका गावडे व शिक्षक सीताराम गावडे यांनी मुख्यमंत्री व आमदारांचे स्वागत केले. संस्थापक सीताराम गावडे यांनी माहिती देताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत व आमदार जीत आरोलकर यांच्या सहकार्यामुळे विद्यालयासाठी साडेतीन हजार चौरस मीटरहून अधिक जागा उपलब्ध झाल्याचे सांगितले. या जागेवर नव्या इमारतीचा प्रस्ताव सादर करण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी पेडणे येथील शैक्षणिक संस्थांना भेट दिली | Achira News