युद्धजन्य परिस्थितीमुळे उद्भवलेल्या गॅस टंचाईचा मोठा फटका पुण्यातील विद्यार्थी मेस सेवांना बसला असून, अनेक भोजनालये बंद झाली आहेत. यामुळे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना सकस आहार मिळणे कठीण झाले असून, त्यांच्या आरोग्यावर व अभ्यासावर विपरीत परिणाम होत आहे. शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी प्रशासनाने गॅसपुरवठा तातडीने सुरळीत करावा किंवा पर्यायी भोजन व्यवस्था उपलब्ध करून द्यावी. वैभव लोमटे, स्पर्धा परीक्षार्थी सध्या गॅस सिलिंडर मिळत नसल्याने अनेक मेस बंद आहेत. त्यामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना इतर मेस तसेच हातगाड्यांवर, स्टॉलवर जे मिळेल त्यावर दिवस काढावे लागत आहेत. काही विद्यार्थी इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर करत आहेत. महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अंतिम सत्रातील परीक्षा अजून बाकी आहेत. त्यामुळे ते विद्यार्थी देखील अडकून पडले आहेत. मेस बंद असल्यामुळे जास्तीचा खर्च करावा लागत असून, तो सर्वसामान्य विद्यार्थ्यांना परवडणारा नाही. महेश घरबुडे. अध्यक्ष, स्पर्धा परीक्षा विद्यार्थी असोसिएशन
गॅस टंचाईमुळे पुण्यातील विद्यार्थी मेस सेवा विस्कळीत, स्पर्धात्मक परीक्षेच्या तयारीवर परिणाम
Pudhari•

Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.