चंदननगर-खराडी भागातील एका फिटनेस क्लबजवळ असलेल्या इमारतीत आरोपी मसाज पार्लर चालवित होते. या मसाज पार्लरमध्ये वेश्या व्यवयास सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी बनावट ग्राहकाच्या माध्यमातून खात्री केली. पोलिसांनी मसाज पार्लरवर छापा टाकून कारवाई केली. मसाज पार्लरमधून तीन पीडित तरुणींची सुटका करण्यात आली आहे. चौकशीत मसाज पार्लरमधील तरुणींना आरोपींनी जादा पैशांचे आमिष दाखवून त्यांना वेश्या व्यवसायास प्रवृत्त केल्याची माहिती मिळाली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सीमा ढाकणे तपास करत आहेत.
चंदननगर-खराडी येथील फिटनेस क्लबजवळ मसाज पार्लरवर छापा
Pudhari•

Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.