Achira News Logo
Achira News

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शासकीय कृषी महाविद्यालयाच्या बांधकामास विलंब

Lokmat
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शासकीय कृषी महाविद्यालयाच्या बांधकामास विलंब
Full News
Share:

बापू सोळंके शासनाने दोन वर्षांपूर्वी परभणी येथील वसंतराव नाईकमराठवाडाकृषी विद्यापीठांतर्गतछत्रपती संभाजीनगरजिल्ह्यात लिहाखेडी (ता. सिल्लोड) येथे शासकीय कृषी महाविद्यालय मंजूर केले. महाविद्यालयासाठी लिहाखेडी येथे ४३ हेक्टर जमीन ६ महिन्यापूर्वीच विद्यापीठाला हस्तांतरितही केली. मात्र, महाविद्यालयाच्या इमारतीसाठी निधीला प्रशासकीय मंजुरी दिली नाही. दुसऱ्या बाजूला महाविद्यालय सुरू होऊन दोन वर्ष उलटले तरी प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे अद्याप मंजूर केलेली नाहीत. संभाजीनगरातील राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाच्या इमारतीत सुरू असलेल्या या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे शिक्षण उधार उसनवारीवर येणाऱ्या गेस्ट लेक्चरर्सवर कसेबसे सुरू आहे. लिहाखेडीत शासकीय कृषी महाविद्यालय मंजूर झाल्यानंतर लगेच प्रवेश प्रक्रियाही राबविण्यात आली. मात्र, महाविद्यालयासाठी लिहाखेडी येथे इमारत नसल्याने गत २ वर्षांपासून हे महाविद्यालय तात्पुरत्या स्वरूपात महानुभाव आश्रम चौकालगतच्या राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाच्या इमारतीत सुरू आहे. राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. सूर्यकांत पवार हे प्रभारी प्राचार्य म्हणून अतिरिक्त कारभार सांभाळत आहेत. शासनाने या महाविद्यालयासाठी कोणत्याही सोयी, सुविधा दिल्या नाही. प्राध्यापकांची पदभरती केलेली नाही. विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी इतर केंद्रांतील कृषीशास्त्रज्ञांना आमंत्रित केले जाते. लिहाखेडी शासकीय कृषी महाविद्यालयाचे यंदा दुसरे वर्ष सुरू आहे. लिहाखेडी येथे जमीन मिळाली आहे. इमारत बांधकामासाठी निधी शासनाने मंजूर केला नाही. प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे मंजूर व्हावीत, यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे.- डॉ. सूर्यकांत पवार, प्रभारी प्राचार्य. ४३ हेक्टर जागा परभणी कृषी विद्यापीठाला हस्तांतरित कृषी महाविद्यालयासाठी शासनाने ४३ हेक्टर जमीन परभणी कृषी विद्यापीठाला हस्तांतरित केली. जमीन मिळाली असली तरी महाविद्यालयाची इमारत, वसतिगृह, प्रशासकीय इमारतीचा आराखडा अद्याप शासनाने मंजूर केलेला नाही. इमारत बांधकाम पूर्ण होईपर्यंत हे महाविद्यालयछत्रपती संभाजीनगरातचसुरू राहणार आहे. हेही वाचा : कमी गुंतवणुकीत जास्त नफा देणारी परदेशी भाजीपाला शेती; जाणून घ्या सविस्तर

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शासकीय कृषी महाविद्यालयाच्या बांधकामास विलंब | Achira News