Achira News Logo
Achira News

छत्रपती संभाजीनगरला नवीन आर्थिक केंद्र म्हणून विकसित करण्याचे भारत सरकारच्या अर्थसंकल्पाचे उद्दिष्ट

Lokmat
छत्रपती संभाजीनगरला नवीन आर्थिक केंद्र म्हणून विकसित करण्याचे भारत सरकारच्या अर्थसंकल्पाचे उद्दिष्ट
Full News
Share:

छत्रपती संभाजीनगर:केंद्रशासनाच्या यंदाच्या अर्थसंकल्पात शहरांचा एकात्मिक विकास ही संकल्पना मांडली आहे. त्या योजनेत शहरात नवीन मेडिकल कॉलेजेस आणि एम्ससारख्या संस्था स्थापन करण्यावर केंद्र शासनाचा या याेजनेतून भर आहे. अशा संस्था शहरात येण्यासाठी स्थानिक नेतृत्वांचे प्रयत्न गरजेचे असतील. टू-टीअर शहरांच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र शासनाकडून सुविधांसाठी निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.छत्रपती संभाजीनगरआर्थिक वाढीचे नवे केंद्र ग्रोथ इंजिन म्हणून विकसित होण्याची पाऊल यातून उचलले जातील. ई-गव्हर्नन्स, सुरक्षित वाहतूक व्यवस्था, पाणीपुरवठा यांसारख्या सुविधांचा यात समावेश आहे. सांडपाणी व्यवस्थापनासाठीही अर्थसाहाय्य मिळेल. अर्थसंकल्पात शहरांच्या विकासासाठी मोठी तरतूद केलेली असून, त्यात छत्रपती संभाजीनगरचा समावेश होणे शक्य आहे. अर्थसंकल्प २०२६-२७ मध्ये टू-टीअर आणि थ्री-टीअर शहरांसाठी ‘सिटी इकॉनॉमिक रिजन’ विकसित करण्याची घोषणा केंद्र शासनाने केली आहे. यासाठी प्रत्येक सीईआरला पाच वर्षांसाठी ५,००० कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित आहे. यातून काही वाटा छत्रपती संभाजीनगरच्या पदरात पडण्यासाठी स्थानिक नेत्यांना प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागणार आहे. यापूर्वी शहर स्मार्ट सिटीतस्मार्ट सिटी उपक्रमातून शहराला १ हजार कोटींच्या आसपास केंद्र शासनाचे अनुदान मिळाले. आता टू टीअरच्या निकषात शहर पात्र आहे. २०११ च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या १४ लाखांच्या आसपास आहे. ज्या शहरात मध्यम खर्च, उत्तम पायाभूत सुविधा, नोकरीच्या संधी आणि सुधारित जीवनशैली उपलब्ध आहे, त्या शहरांसाठी ही योजना आहे, त्या श्रेणीत छत्रपती संभाजीनगर आहे. टू टीअरच्या श्रेणीत शहर येते...छत्रपती संभाजीनगर हे शहर टू टीअरच्या श्रेणीत येते. त्यामुळे या श्रेणीसाठी केंद्र शासनाने केलेल्या तरतुदींचा लाभ घेण्यासाठी प्रयत्न करता येतील.- जी.श्रीकांत, मनपा प्रशासक.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

छत्रपती संभाजीनगरला नवीन आर्थिक केंद्र म्हणून विकसित करण्याचे भारत सरकारच्या अर्थसंकल्पाचे उद्दिष्ट | Achira News