Rupee Slides to All-Time Low:शुक्रवारी, 20 मार्च रोजी, अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया 93.94 च्या विक्रमी नीचांकी पातळीवर घसरला आहे. देशांतर्गत बाजार एकीकडे आदल्या दिवसाच्या मोठ्या घसरणीतून सावरताना दिसत आहे, तर दुसरीकडे मजबूत डॉलर, कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि परकीय निधी सतत बाहेर पडणे यासारख्या जागतिक आणि देशांतर्गत घटकांमुळे रुपयावर दबाव राहिला. इराण-अमेरिका युद्ध सुरू झाल्यापासून रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत कमकुवत होत आहे.अमेरिकन डॉलरसमोर रुपयाचा नीचांकशुक्रवारी, आठवड्याच्या शेवटच्या व्यापार दिवशी, रुपया पहिल्यांदाच 93 वर पोहोचला. पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या जागतिक ऊर्जा पुरवठ्यात व्यत्यय आल्याने झालेल्या नुकसानीत वाढ झाल्याने सुरुवातीच्या व्यवहारात रुपया अमेरिकी डॉलरच्या तुलनेत 3 पैशांनी घसरून 92.92 वर आला, ज्यामुळे आशियातील तिसऱ्या सर्वात मोठ्याअर्थव्यवस्थेचा विकास-महागाईचा समतोलबिघडण्याचा धोका निर्माण झाला.West Asia Conflict: सागरी संकटात भारताचे ‘सुरक्षा’ कवच, निर्यातदारांना सरकारकडून 497 कोटींची ‘RELIEF’ संजीवनीची घोषणाभडकलेल्या युद्धात तेलाला उकळीआखाती देशातील महत्त्वपूर्ण ऊर्जा सुविधांवरील हल्ल्यांमुळे गुरुवार, 19मार्च रोजी तेलाचे दर प्रति बॅरल जवळपास 120 डॉलरपर्यंत वधारले, मात्र शुक्रवारी काहीशी घसरण दिसून आली. मध्यपूर्वेतील ऊर्जा पायाभूत सुविधांवर झालेल्या हल्ल्यांमुळे मागील सत्रात 119.13 डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचलेले 'ब्रेंट क्रूड' शुक्रवारी घसरून 107 डॉलर प्रति बॅरलवर आले.राजीनामा देताच HDFC बँकेचे तब्बल 1 लाख कोटी रुपये पाण्यात; अतनु चक्रवर्ती नेमके कोण?इराणने कतारच्या रास लाफान औद्योगिक शहर, जे एक महत्त्वाचे जागतिक LNG केंद्र आहे, हवाई हल्ल्यांची नवी लाट आणल्यानंतर क्रूडचा भाव उसळला. या सुविधेचे झालेले नुकसान दुरुस्त होण्यास अनेक वर्षे लागण्याची शक्यता असून यामुळेतेलाच्या किमती गगनाला भिडल्या.त्याचवेळी, युरोपीय देशांचा एक गट आणि जपानने होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरक्षित मार्ग सुनिश्चित करण्यासाठी आणि ऊर्जा बाजाराला शांत करण्यासाठीच्या ‘खऱ्या प्रयत्नांना’ पाठिंबा देण्याची हमी दिल्यानंतर किमती स्थिर झाल्या.Oil Supply: 'होर्मुझ' कोंडीनं अमेरिकेत हाहाकार; ट्रम्प इराणवरील 'तेल निर्बंध' हटवण्याच्या विचारातरुपयाचा नवीन नीचांक, रिझर्व्ह बँकेच्या भूमिकेकडे लक्षयुद्धामुळे दबावाखाली आलेल्या आणि सतत नवीन नीचांक गाठणाऱ्या रुपयाला सावरण्यासाठी रिझर्व्ह बँकेने मार्च महिन्यात 15 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त डॉलरची विक्री केल्याचा अंदाज असून आता रुपया 93 च्या पातळीखाली घसरू नये यासाठी आरबीआय डॉलरची विक्री सुरू ठेवेल, अशी व्यापाऱ्यांची अपेक्षा आहे. आरबीआयचा हस्तक्षेप सामान्यतः आर्थिक वर्षाच्या शेवटी तीव्र होतो, ज्यामुळे अल्पकालीन आधाराची शक्यता निर्माण होते.
जागतिक आणि देशांतर्गत दबावामुळे भारतीय रुपयाची सार्वकालिक नीचांकी पातळीवर घसरण
Maharashtra Times•
Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Maharashtra Times
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.