Achira News Logo
Achira News

जागतिक स्तरावर 12,000 ते 15,000 कर्मचाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात कपात करण्याची कॉग्निझंटची घोषणा

Lokmat
जागतिक स्तरावर 12,000 ते 15,000 कर्मचाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात कपात करण्याची कॉग्निझंटची घोषणा
Full News
Share:

Cognizant Layoff:आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी कॉग्निझंटमध्ये मोठ्या प्रमाणावर नोकरकपातीची तयारी सुरू झाली आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे जागतिक स्तरावर सुमारे १२,००० ते १५,००० कर्मचाऱ्यांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. यामध्ये भारतातील कर्मचाऱ्यांना सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भारतावर सर्वाधिक परिणाम? कंपनीत सुमारे ३,५७,०००कर्मचारीकार्यरत असून त्यापैकी जवळपास २,५०,०००कर्मचारीभारतात आहेत. त्यामुळे होणाऱ्या कपातीचा मोठा भाग भारतात होण्याची शक्यता आहे. ‘प्रोजेक्ट लीप’ अंतर्गत पुनर्रचना कॉग्निझंटने नुकत्याच जाहीर केलेल्या ‘Project Leap’ अंतर्गत ही पुनर्रचना केली जात आहे. कंपनीला या प्रक्रियेसाठी $२३० मिलियन ते $३२० मिलियन इतका सेवरन्स खर्च (भरपाई) अपेक्षित आहे. कंपनीचे CEO रवी कुमार यांनी सांगितले की, ही जागतिक पातळीवरील प्रक्रिया असून, कंपनीच्या विविध विभागांमध्ये टप्प्याटप्प्याने राबवली जाईल. कामकाजाच्या पद्धतीत बदल कंपनी आता डिजिटल तंत्रज्ञान आणि मानवी कामाचा समन्वय असलेल्या नव्या मॉडेलकडे वळत आहे. यामुळे भविष्यात काम करण्याच्या पद्धतीत मोठे बदल होण्याची शक्यता आहे. नव्या भरतीची योजना कायम विशेष म्हणजे, फेब्रुवारीत कंपनीने २०२६ मध्ये सुमारे २४,००० ते २५,००० नव्या ग्रॅज्युएट्सची भरती करण्याची घोषणा केली होती. ही रणनीती कंपनीच्या वर्कफोर्स स्ट्रक्चरला तळापासून मजबूत करण्याचा भाग आहे. Coinbase मध्येही नोकरकपात दरम्यान, क्रिप्टोकरन्सी क्षेत्रातील Coinbase या कंपनीनेही सुमारे १४% कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीचे CEO ब्रायन आर्मस्ट्रॉंग यांनी या निर्णयामागे दोन प्रमुख कारणे दिली. पहिले म्हणजे, क्रिप्टो बाजारातील मंदी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स मुळे बदलणारी कामाची पद्धत. तज्ज्ञांच्या मते, जागतिक स्तरावर आयटी आणि टेक कंपन्यांमध्ये नोकरकपातीचा ट्रेंड वाढत आहे. AI चा वाढता वापर आणि बाजारातील अनिश्चितता यामुळे कंपन्या खर्च कमी करण्याच्या दिशेने पावले उचलत आहेत. भविष्यात कौशल्याधारित आणि डिजिटल-फोकस्ड कामकाजालाच अधिक प्राधान्य मिळण्याची शक्यता आहे.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

जागतिक स्तरावर 12,000 ते 15,000 कर्मचाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात कपात करण्याची कॉग्निझंटची घोषणा | Achira News