पुणे - अजितदादांच्या बंगल्याबाहेर नाशिकच्या भोंदूबाबाने जादूटोणा केला तर मग या भोंदूबाबाबाला भोंदूगिरीची सुपारी देणारे राजकीय राक्षस कोण? त्यांचा या राक्षसी महत्त्वाकांक्षेचा राजकीय हेतू काय होता? असा थेट प्रश्न आमदाररोहित पवारयांनी उपस्थित केला आहे.अजित पवारयांच्या विमान अपघाताशी संबंधित कनेक्शन नाशिकच्या भोंदूबाबाशी जोडणारा दावा आमदारअमोल मिटकरीयांनी केला. मिटकरींच्या या दाव्यावरूनरोहित पवारांनीहीप्रश्न उपस्थित केले आहेत. आमदार रोहित पवार म्हणाले की, पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रात भोंदूगिरीला स्थानही नाही आणि त्यावर कोणाचा विश्वासही नाही. परंतु आमदारअमोल मिटकरीम्हणत असल्याप्रमाणे अजितदादांच्या सहयोग सोसायटी येथील निवासस्थानाच्या बाहेर केलेला जादूटोणा तसेच देवगिरी बंगल्याबाहेर नाशिकच्या भोंदूबाबाबाच्या माध्यमातून जादूटोणा झाल्याची समोर येत असलेली माहिती बघता हे प्रकरण खूपच भयंकर दिसते असं त्यांनी म्हटलं. तसेच या काळात अजितदादांच्या बंगल्यावर भोंदू खरात याच्याशी जवळीक असणारे कोण कोण आले?, २७ जानेवारी रोजी संबंधित लोक देवगिरिवर आले होते का? याचा तपास होणे गरजेचे आहे. सुनेत्राकाकी, पार्थ आणि जय यांनी काळजी घ्यावी, कारण आजचं बेभरवशी राजकारण चांगलं राहिलेलं नाही असा सल्लाही रोहित पवार यांनी दिला आहे. काय म्हणाले होते अमोल मिटकरी? १८, १९ आणि २० नोव्हेंबर २०२५ रोजी शिवरात्री, अमावस्या होती. याच काळातअजित पवारांच्याबारामती येथील सहयोग सोसायटीबाहेर भिगवण रोडला अघोरी पूजेचा प्रकार केला गेला. लिंगपिसाट भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात याच्या शिवलिका आश्रम हा भगवान शंकराच्या पूजेचा आहे. या आश्रमात अघोरी पूजा व्हायची असा दावा आमदार मिटकरी यांनी केला. या पूजेत लिंबू पुजले होते, कुंकू हळद होते. कुणाच्या तरी सांगण्यावरून हा अघोरी प्रकार केला गेला होता का? आता व्हीएसआर विमानासोबत या बाबाचे फोटो पाहता त्याचे या कंपनीच्या मालकासोबत राजकीय कनेक्शन असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या प्रकरणात एसआयटी असेल सीआयडी असेल त्यांनी या भोंदूबाबाचे २६ ते ३१ जानेवारीपर्यंतचे कॉल डिटेल्स काढावेत. हा कुणाच्या संपर्कात होता हे शोधावे अशी मागणी मिटकरी यांनी केली आहे.
जादूटोणा प्रकरणाशी पवारांचा संबंध असल्याचा महाराष्ट्र आमदाराचा दावा
Lokmat•

Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.