Achira News Logo
Achira News

जमीन खरेदी घोटाळाप्रकरणी पुणे पोलिसांनी कुलसचिवांविरोधात आरोपपत्र दाखल केले

Lokmat
जमीन खरेदी घोटाळाप्रकरणी पुणे पोलिसांनी कुलसचिवांविरोधात आरोपपत्र दाखल केले
Full News
Share:

पिंपरी :मुंढवायेथील ४० हेक्टर जागेच्या खरेदी-विक्री घोटाळा प्रकरणात बावधन पोलिसांनी सहदुय्यम निबंधक रवींद्र तारू आणि जमीन विक्रीबाबत कुलमुखत्यार पत्र असलेली शीतल तेजवाणी या दोघांविरुद्ध पौड न्यायालयात सोमवारी (दि. २) दोषारोपपत्र सादर केले. या गुन्ह्यात पसार असलेला दिग्विजय पाटील याच्याविरुद्ध पुरवणी दोषारोपपत्र सादर करून तपास सुरू ठेवला आहे. पोलिस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार,मुंढवायेथील ४० हेक्टर जागेच्या खरेदी-विक्री घोटाळा प्रकरणात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांची भागीदारी असलेल्या ‘अमेडिया इंटरप्रायजेस एलएलपी’ कंपनीचे भागीदार दिग्विजय अमरसिंह पाटील, जमीन विक्रीबाबत कुलमुखत्यार पत्र असलेली महिला शीतल तेजवाणी आणि दस्त नोंदणी करणारे सहदुय्यम निबंधक रवींद्र तारू या तिघांविरुद्ध बावधन पोलिस ठाण्यात ६ नोव्हेंबर २०२५ रोजी गुन्हा दाखल केला होता.या प्रकरणात तेजवाणी हिलापुणेपोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर बावधन पोलिसांनी तिचा ताबा घेतला. तर, या प्रकरणातील संशयित सहदुय्यम निबंधक तारू याला भोर येथील त्याच्या राहत्या घरातून अटक केली होती. मात्र, या गुन्ह्यातील संशयित पाटील हा अद्याप पसार आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर निर्धारित मुदतीत दोषारोपपत्र सादर करणे आवश्यक असल्याने बावधन पोलिसांनी सोमवारी तारू आणि तेजवाणी या दोघांविरुद्ध पौड न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. तर, गुन्ह्यातील पसार संशयित दिग्विजय पाटील याच्याविरुद्ध पुरवणी दोषारोपपत्र सादर करून तपास सुरू ठेवला आहे.- विशाल गायकवाड (पोलिस उपायुक्त)

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

जमीन खरेदी घोटाळाप्रकरणी पुणे पोलिसांनी कुलसचिवांविरोधात आरोपपत्र दाखल केले | Achira News