Achira News Logo
Achira News

ज्योतिषीवरील बलात्काराच्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने घेतली बचावात्मक भूमिका

Lokmat
ज्योतिषीवरील बलात्काराच्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने घेतली बचावात्मक भूमिका
Full News
Share:

Praful Patle on Ashok Kharat:नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील अंकशास्त्रज्ञ आणि स्वयंघोषित ज्योतिषीअशोक खरातयाच्यावर बलात्काराचे गंभीर गुन्हे दाखल झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ सुरू झाली आहे. या प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षारुपाली चाकणकरयांचे नाव वारंवार समोर येत असल्याने आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही बचावात्मक पाऊल उचलले आहे. पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल यांनी या प्रकरणी कारवाई करण्याचे संकेत दिल्याने चाकणकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. अशोक खरातयाने आपल्या कार्यालयात अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. दरम्यान, सोशल मीडियावर खरात आणिरुपाली चाकणकरयांचे काही व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये चाकणकर या खरातचे पाद्यपूजन करताना, त्याच्या पाया पडताना आणि त्याच्यावर छत्री धरताना दिसत आहेत. महिला आयोगाच्या अध्यक्षा एका भोंदू बाबासमोर अशा प्रकारे नतमस्तक झाल्याने विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. प्रफुल पटेलांची रोखठोक भूमिका वाढत्या दबावानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांनी पत्रकार परिषद घेऊन पक्षाची अधिकृत भूमिका स्पष्ट केली. "अशोक खरातने जे काही केले आहे, ते अतिशय निंदनीय आणि घाणेरडे आहे. यावर सक्त कारवाई केली पाहिजे. या प्रकरणात ज्या ज्या राजकीय व्यक्तींची नावे जोडली गेली आहेत, त्या सर्वांची सखोल चौकशी केली जाईल. केवळ खरातवरच नाही, तर त्याच्याशी संबंधित असलेल्यांवरही सक्तीने कारवाई होणे गरजेचे आहे," असेप्रफुल्ल पटेलम्हणाले. ज्या राजकीय लोकांचे नाव त्याच्याशी जोडलं आहे त्यावर आम्ही राष्ट्रवादी म्हणून योग्य कारवाई करणार, असेही पटेल म्हणाले. महत्त्वाचे म्हणजे, येत्या एक-दोन दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यावर मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. आम्ही पक्ष म्हणून योग्य ती पावले उचलू, असे सांगत पटेलांनी अप्रत्यक्षपणे रुपाली चाकणकर यांच्या पदाबाबत सूचक विधान केले आहे. फोटोंवरुन संबंध जोडणे हे योग्य नाही. कारण अनेक मान्यवरांचे फोटो आहेत. सार्वजनिक जीवनात अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो, असेही पटेल यांनी म्हटलं. अशोक खरात राजकारण्यांचा आवडता ज्योतिषी? नाशिकचा हा भोंदू बाबा केवळ सामान्य महिलांनाच नव्हे, तर राज्यातील अनेक बड्या राजकीय हस्तींनाही आपल्या जाळ्यात ओढून बसला होता. ज्योतिषशास्त्राच्या नावाखाली मंत्र-मंत्राचे सल्ले देण्यासाठी अनेक मोठे नेते त्याच्याकडे जात असल्याचा दावा केला जात आहे. दरम्यान, नाशिक पोलिसांनी खरातला बेड्या ठोकल्या असून त्याच्या विरोधात सबळ पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. दुसरीकडे, रुपाली चाकणकर यांना पदावरून हटवण्यासाठी विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

ज्योतिषीवरील बलात्काराच्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने घेतली बचावात्मक भूमिका | Achira News