झी मराठीवरील सर्व मालिका या नेहमीच प्रेक्षकांच्या आवडत्या असतात. मध्यंतरीचा काळ हा झी मराठीसाठी थोडा उतरतीचा ठरला पण आता पुन्हा एकदा या वाहिनीने आपल्या मालिकांद्वारे टीआरपीच्या स्पर्धेत बाजी मारली आहे. या वाहिनीवरील सर्व मालिका सध्या त्यांच्या कथानकामुळे चर्चेत आहे. गेल्या वर्षी सुरु झालेली लक्ष्मी निवासी मालिका एक तासासाठी प्रसारित होते. या मालिकेत तीन नायिकांच्या वेगवेगळ्या कथा दाखवण्यात आल्या आहेत. भावना सिद्धू, जयंत जान्हवी आणि लक्ष्मी श्रीनिवास यांच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना प्रेक्षकांना भरपूर खिळवून ठेवतात.Tharala Tar Mag : प्रियाचे दोन्ही साथीदार जेलबंद, एकटी लढवणार खोटेपणाची खिंड! सायलीच रविराज प्रतिमाची लेक... नवा अध्याय सुरूया मालिकेमधलेजयंत आणि जान्हवीहे कपल थोडे मिस मॅच आहे. जयंतचे जान्हवी वरील अति प्रेम हे तिच्या घुसमटीचे कारण ठरते. त्याचा वेडेपणा तिच्या जीवावर बेतत असतो त्यामुळे ती जीव देते पण त्यातूनही ती वाचते. यादरम्यान तिचा जीवाभावाचा मित्र विश्वा तिला मदत करत असतो. आपली पत्नी हे जग सोडून गेली हा सदमा जयंतला सहन होत नाही. पण एके दिवशी त्याला जान्हवी जीवंत असल्याचं सत्य कळतं. आणि मग तो तिचा शोध घेण्यासाठी अतोनात प्रयत्न करतो. सतत लपवाछपीच्या खेळाला आता जान्हवी सुद्धा वैतागली आहे.Sunetra Pawar उपमुख्यमंत्री होताच अंकिता वालावलकरची पोस्ट, 'मतभेद असू शकतात पण माणूस...'Lakshmi Niwas या मालिकेचा नवीन प्रोमो आता समोर येतोय. यामध्ये जान्हवीचा शोध घेत जयंत विश्वाच्या घरी जातो तेव्हा जान्हवी लपून बसलेली असते आणि ती अचानक समोर येऊन त्याला दचकवते. जयंत घाबरतो तेव्हा ती म्हणते की, हीच भीती मला तुझ्या चेहऱ्यावरती बघायची होती जयंत. आता मी सगळ्यांच्या समोर येणार... माझ्यासाठी आणि माझ्या माणसांसाठी. जान्हवी आता लपून न बसतात थेट जयंतला फुलं आव्हान देत आहे.View this post on InstagramA post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)हा प्रोमो पाहिल्यावर प्रेक्षक खुश झाले आहेत. अनेकजण झी मराठीची तुलना आता स्टार प्रवाह वाहिनीशी करत आहेत. झी मराठीने स्टार प्रवाहला खुला आव्हान दिलय अशी कमेंट एकाने केली आहे. एकाने म्हटलं की जानवी परत धमाका, जयंतला आता तुझ्या तालावर नाचव, तर दुसऱ्याने जयंत आणि जान्हवी पुन्हा एकत्र एका फ्रेम मध्ये दिसत असल्यामुळे आनंद व्यक्त केलाय.
झी मराठी मालिकांनी मनोरंजक कथांसह लोकप्रियता परत मिळवली
Maharashtra Times•
Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Maharashtra Times
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.