मुंबई :टी २० वर्ल्ड कप जिंकल्यावर भारताचा स्टार खेळाडू शिवम दुबे हा आपल्या घरी परतताना ट्रेनने गेलेला होता. पण शिवम दुबेने ट्रेननेच जाण्याचा मार्ग का निवडला? अहमदाबादहून मुंबईकडे अनेक फ्लाईट होत्या पण तरीही तो ट्रेननेच मुंबईकडे आला. वर्ल्ड कपची ट्रॉफी जिंकल्यावर काही तासांमध्येच तो मुंबईच्या दिशेने रवाना झालेला होता. परंतु ट्रेनने येणे मागचे नेमकं कारण काय याबाबत स्वतः शिवम दुबे याने खुलासा केला आहे. तर शिवम दुबेने नेमकं काय कारण सांगितलं, जाणून घ्या.शिवम दुबेयाला आपल्या कुटुंबाला लवकरात लवकर भेटण्याची इच्छा होती. आपल्या लहान मुलाला आणि वडिलांना भेटण्याची त्याची इच्छा होती त्यासाठीच तो सकाळी लवकर ट्रेनमध्ये बसला आणि निघाला. तो जास्त वेळ वाट पाहू शकत नव्हता. सकाळी फ्लाईट उपलब्ध नसल्याने त्याने ट्रेन येण्याचा निर्णय घेतला. शिवम दुबे त्याची पत्नी अंजुम खान आणि एका मित्रासह 3 टायर एसी ट्रेनने पहाटे पाच वाजता निघाला होता. यावेळी त्याला टीसीने विचारलं होतं की तू क्रिकेटर तर नाहीस ना? हा किस्सा शिवमने सांगितला.IPL 2026 : आयपीएलमध्ये दुसऱ्यांदाच सर्व संघांचे कर्णधार भारतीय, ईशान किशनचं नशीब चमकलं, संपूर्ण यादी समोरशिवम दुबे काय म्हणाला?मी ट्रेनमध्ये मास्क, टोपी घालून बसलो होतो. पण एकाने मला ओळखलं. पण तो कन्फ्युज होता. तेव्हा मी पत्नीला सांगितले की सर्व लाईट बंद कर. त्यानंतर टीसी आला आणि टीसी म्हणाला की अरे तू शिवम दुबे म्हणजे तो क्रिकेटर तर नाही ना? त्यावेळी मी म्हटले की नाही नाही क्रिकेटर नाही. तर माझी पत्नी म्हणजे, तो कसा येईल? तितक्यात तिथे एक असलेला माणूस म्हणाला की. अरे तो तरवर्ल्ड कपजिंकला आहे. तो तिकडे पार्टी करत असेल, कशाला इथे येईल? असं शिवम दुबेने सांगितलं.IPL 2026 : ईशान SRH चा नवा कर्णधार, उपकर्णधार पदावर अभिषेकची वर्णी, कमिन्सबाबत महत्वाची अपडेट समोरदरम्यान, सुरूवातीला बातम्या आल्या तेव्हा कोणाच विश्वास बसला नाही. पण काही काही दिवसांनी सोशल मीडियावर हे निश्चित झालं की तो शिवमच होता. आता मुलाखतींमध्ये शिवम स्वत: या प्रवासाचा किस्सा सांगतो. वर्ल्ड कप २०२६ सोबत दुबेचा हा अहमदाबाद टू मुंबई प्रवास चाहत्यांच्या कायम लक्षात राहणार असेल.
टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर कुटुंबासमवेत पुन्हा एकत्र येण्यासाठी शिवम दुबे प्रशिक्षण घेऊन घरी परतला
Maharashtra Times•
Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Maharashtra Times
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.