Narayan Jagadeeshan Century Against USA in A T20 World Cup Warm Up Match : टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत सूर्याच्या संघाला भिडण्याआधी अमेरिकेचा संघ भारतीय 'अ' संघाविरुद्ध सराव सामन्यासाठी मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले. नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात अमेरिकेचा कर्णधार मोनांक पटेलनं नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय भारतीय 'अ' संघातील विकेट किपर बॅटर आणि सलामीवीर नारायण जगदीशन याने फोल ठरवला. 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! प्रियांश आर्य यानेही २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा पहिल्यांदा फलंदाजी करताना प्रियांश आर्य आणि एन जगदीशन जोडीनं भारतीय 'अ' संघाच्या डावाची सुरुवात केली. दोघांनी दमदार सुरुवात केली. पण प्रियांश आर्य याने १३ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने २१५.३८ च्या स्ट्राइक रेटनं २८ धावांची खेळी केली. भारताविरुद्ध न खेळण्याच्या निर्णयाचा पाकिस्तानला पश्चात्ताप होईल, पण...- शाहिद आफ्रिदी एन जगदीशनचीतिलक वर्माच्यासाथीनं शतकी भागीदारी अमेरिकेविरुद्धच्या सराव सामन्यात भारतीय 'अ' संघाकडूनतिलक वर्मानंहीक्रिकेटच्या मैदानात कमबॅक केले. जगदीशनच्या साथीनं तिसऱ्या विकेटसाठी त्याने ५५ चेंडूत ११३ धावांची भागीदारी रचली. तिलक वर्मा कमबॅकच्या सामन्यात अर्धशतक अगदी सहज झळकावेल, असे वाटत होते. पण २४ चेंडूत ३८ धावा करून तो बाद झाला. दुसऱ्या बाजूला जगदीशन याने आपला शो कायम ठेवला. जगदीशनची शतकी खेळी, आयुष बडोनीचं अर्धशतक जगदीशन याने ४९ चेंडूत शतक साजरे करताना २०० च्या स्ट्राइक रेटनं अमेरिकन गोलंदाजांची धुलाई केली. ५५ चेंडूत ११ चौकार आणि ४ षटकाराच्या मदतीने १०४ धावा करून तो बाद झाला. त्यानंतर आयुष बडोनी याने आपल्या भात्यातील फटकेबाजीचा नजराणा पेश करत २०० पेक्षा अधिकच्या स्ट्राइक रेटनं अर्धशतक झळकावले. भारत 'अ' संघाने निर्धारित २० षटकात ३ विकेट्सच्या मोबदल्यात २३८ धावा करत अमेरिकेसमोर २३९ धावांचे टार्गेट सेट केल्याचे पाहायला मिळाले. भारती 'अ' संघातील फलंदाजांनी अमेरेकेच्या गोलंदाजांची ज्या प्रकारे धुलाई केली ते पाहून वर्ल्ड कप मोहिमेच्या पहिल्याच सामन्यात सूर्या दादाची टीम इंडिया ३०० पारचा आकडा गाठू शकेल, असे चित्र या सामन्यानंतर निर्माण झाले आहे.
टी-20 विश्वचषक सराव सामन्यात नारायण जगदीशनचे अमेरिकेविरुद्ध शतक
Lokmat•
Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.