Achira News Logo
Achira News

टी-20 विश्वचषक सराव सामन्यात भारत'अ'चा अमेरिकेवर दणदणीत विजय

Lokmat
टी-20 विश्वचषक सराव सामन्यात भारत'अ'चा अमेरिकेवर दणदणीत विजय
Full News
Share:

India A vs United States of America T20 World Cup Warm up Matches : आयसीसी टी २० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेच्या यंदाच्या हंगामाला ७ फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. त्याआधी या स्पर्धेतील सराव सामन्याला सुरुवात झाली आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ यंदाच्या वर्ल्ड कप मोहिमेची सुरुवात अमेरिकेविरुद्धच्या लढतीनं करणार आहे. त्याआधी दुखापतीतून सावरुनतिलक वर्माअमेरिकेच्या संघाविरुद्ध मैदानात उतरला आहे. भारत 'अ' संघाकडूनतिलक वर्माअमेरिकेविरुद्धच्या सराव सामन्यात खेळत आहे. 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! तिलक वर्माच्या कामगिरीकडेही असतील सर्वांच्या नजरा भारत 'अ' विरुद्ध अमेरिका यांच्यातील सराव सामना मुंबईतील डी. वाय. पाटील क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. या सामन्यात अमेरिकेच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय 'अ' संघाचे नेतृत्व आयुष बडोनीकडे आहे. दुसरीकडे अमेरिकेचा संपूर्ण वर्ल्ड कपसाठी निवडलेला संघ या सामन्यात खेळत आहे. त्यामुळे या लढतीत अमेरिकेचा संघ कशी कामगिरी करतो? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याशिवाय तिलक वर्मा या सामन्यात कितव्या क्रमांकावर फलंदाजीला येणार? त्यावरही सर्वांच्या नजरा असतील. रणजी ट्रॉफी स्पर्धेत अचानक तब्येत बिघडल्यावर तिलक वर्मावर शस्त्रक्रिया करण्याची वेळ आली होती. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेला मुकल्यावर तो वर्ल्ड कप स्पर्धेआधी मैदानात उतरणार आहे. आगामी वर्ल्ड कप स्पर्धेसाठी तो भारतीय संघातील एक प्रमुख फलंदाज असून सराव सामन्यात त्याला भारतीय 'अ' संघाकडून कितव्या स्थानावर तो फलंदाजी करणार ते पाहण्याजोगे असेल. IND vs PAK: पाकिस्तानच्या निर्णयामुळे ICCचा संताप, 'या' पाच प्रकारे कारवाई होण्याची शक्यता​​​​​​​भारत ‘अ’ संघ: एन. जगदीशन (यष्टीरक्षक), प्रियांश आर्य, तिलक वर्मा, नमन धीर, आयुष बडोनी (कर्णधार), रियान पराग, उर्विल पटेल, आशुतोष शर्मा, रवि बिश्नोई, खलील अहमद, मयंक यादव, अशोक शर्मा, विप्रज निगम, गुरजापनीत सिंह, मानव सुथार. अमेरिका संघ: अँड्रीज गौस, सैतेजा मुक्कमल्ला, मोनांक पटेल (यष्टीरक्षक/कर्णधार), शेहान जयसूर्या, शुभम रंजने, संजय कृष्णमूर्ती, शयान जहांगीर, हरमीत सिंग, शॅडली व्हॅन शाल्कविक, अली खान, सौरभ नेत्रावळकर, मिलिंद कुमार, मोहम्मद मोहसिन, नोस्टुश केनजिगे, जसदीप सिंग.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

टी-20 विश्वचषक सराव सामन्यात भारत'अ'चा अमेरिकेवर दणदणीत विजय | Achira News