इंग्लंड अँण्ड वेल्स क्रिकेट बोर्डाच्या यजमानपदाखाली रंगणाऱ्या महिला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठीभारतीय महिला क्रिकेट संघाचीघोषणा करण्यात आली आहे. वनडे वर्ल्ड कप जिंकल्यावर छोट्या फॉरमॅटमध्ये पहिला वहिला विश्वचषक जिंकण्यासाठी निवडलेल्या १५ रणरागणींमधील नंदिनी शर्मा हिने सर्वांचे लक्षवेधले आहे. कारण पहिल्यांदाच तिला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघात संधी मिळाली आहे. एका बाजूला अमनजोत कौर आणि टीम इंडियातील ब्युटी हरलीन देओल यांना टी-२० संघात स्थान मिळाले नसताना ही नंदिनी शर्मा कोण? अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगू लागली आहे. 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!गल्ली क्रिकेट ते टी-२० वर्ल्ड कप व्हाया WPL; कोण आहे नंदिनी शर्मा नंदिनी शर्मा ही उजव्या हाताची मध्यम जलदगती गोलंदाज आहे. महिला प्रीमियर लीगच्या गत हंगामात दिल्ली कॅपिटल्स महिला संघाकडून खेळताना तिने हॅटट्रिकसह मैफील लुटली होती. एवढेच नाही तर तिने पर्पल कॅपही जिंकली होती. या स्वप्नवत कामगिरीनंतर आता टी-२० वर्ल्ड कपसाठी तिने भारतीय महिला संघात स्थान मिळवले आहे. WPL 2026 : कोण आहे नवी ‘हॅटट्रिक क्वीन’? रातोरात स्टार झालेल्या छोरीचा गल्ली ते दिल्लीपर्यंतचा प्रवास वय कमी असल्यामुळे अकादमीत प्रवेश नाकारला, पण... नंदिनी मुळची चंडीगडची आहे. २० सप्टंबर २००१ रोजी जन्मलेल्या नंदिनीचा क्रिकेटचा प्रवास हा गल्ली क्रिकेटमधून सुरु झाला. भावाला पाहून ती क्रिकेटच्या प्रेमात पडली. वयाच्या ८ व्या वर्षी ती व्यावसायिक क्रिकेटचे धडे घेण्यासाठी अकादमीत प्रवेश घेण्यासाठी गेली. पण वय कमी असल्यामुळे तिला प्राथमिकता मिळाली नाही. पण तिने हार न मानता जिद्दीनं क्रिकेटच्या मैदानात आपली प्रतिभा दाखवून दिली. बॅक-ऑफ-द-हँड स्लोअर बॉल ही तिच्या गोलंदाजीतील खासियत आहे. आशिया कप रायझिंग स्टार्स स्पर्धेतही भारतीय संघात दिसली मध्यमगती गोलंदाज म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या नंदिनी शर्माने महिला प्रीमियर लीगमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून १० सामने खेळताना १७ विकेट्स घेतल्या आहेत. तिच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळेच तिला हरमनप्रित कौरच्या संघात मोठी संधी मिळाली आहे. यंदा फेब्रुवारीमध्ये बँकॉक येथे झालेल्या महिला आशिया कप रायझिंग स्टार्स स्पर्धेत ती भारतीय संघाचा भाग होती.
टी-20 विश्वचषकासाठी भारतीय महिला क्रिकेट संघाची घोषणा
Lokmat•

Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.