Achira News Logo
Achira News

टी-20 सामन्यावर बहिष्कार टाकल्याप्रकरणी पाकिस्तानवर कायदेशीर कारवाई करण्याची आयसीसीची धमकी

Maharashtra Times
टी-20 सामन्यावर बहिष्कार टाकल्याप्रकरणी पाकिस्तानवर कायदेशीर कारवाई करण्याची आयसीसीची धमकी
Full News
Share:

मुंबई:मंगळवारी पीसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 15 फेब्रुवारी रोजी भारताविरुद्धच्या सामन्यावर पाकिस्तानने बहिष्कार टाकल्यानंतर आयसीसीने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला अधिकृत T20 World Cup 2026 प्रसारकांकडून कायदेशीर कारवाईची शक्यता असल्याचा इशारा दिला आहे. पाकिस्तानने आपल्या सरकारच्या सूचनांचे पालन करून 15 फेब्रुवारी रोजी कोलंबो येथे सामना न खेळण्याचा निर्णय घेतला, परंतु अद्याप ICC त्याची कारणे अधिकृतपणे कळवली नाहीत.पाकिस्तानचं मोठं नुकसानपीटीआयच्या वृत्तानुसार,आयसीसी पाकिस्तानचा संपूर्ण वार्षिक महसूल हिस्सा,अंदाजे 35 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स म्हणजे जवळजवळ 300 कोटी रोखू शकतात आणि त्या निधीतून प्रसारकांना भरपाई देऊ शकते अशी शक्यता आहे. पीसीबीच्या एका सूत्राने सांगितले की, जरी अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी गेल्या आठवड्यात पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना या मुद्द्यावर माहिती देण्यापूर्वी बोर्डाच्या कायदेशीर तज्ञांशी चर्चा केली.T20 World Cup ला अवघे काही दिवस शिल्लक, भारतीय संघाला सतावतेय 'ती' एक भीती, गंभीर-सूर्यासमोर मोठं आव्हानपीसीबीच्या सूत्राने सांगितले की, "जर पाकिस्तानने माघार घेतली नाही आणि भारताविरुद्ध खेळला नाही, तर त्यांना केवळ आर्थिक दंड आणि कदाचित प्रसारकांकडून खटला भरावा लागेल." पीसीबीच्या दुसऱ्या सूत्राने पीटीआयला सांगितले की, "भारताविरुद्ध खेळू नये असे सरकारचे निर्देश असूनही पीसीबीला अडचणी येऊ शकतात, कारण ते त्यांचे सर्व सामने भारतात न खेळता त्यांच्या इच्छेनुसार तटस्थ ठिकाणी (श्रीलंका) खेळत आहेत."सूत्र पुढे म्हणाले, "दुसरे म्हणजे, भारत सरकारने त्यांच्या संघाला पाकिस्तानमध्ये खेळण्याची परवानगी दिली नसली तरी, मे महिन्यातील संघर्षानंतरही आशिया कप किंवा आयसीसी स्पर्धांमध्ये तटस्थ ठिकाणी पाकिस्तानविरुद्ध खेळण्यापासून रोखले नाही." पीसीबीने अद्याप आयसीसीला त्यांच्या निर्णयाची लेखी माहिती दिलेली नाही. "जेव्हा आयसीसीने सर्व आयसीसी स्पर्धांसाठी प्रसारकासोबत चार वर्षांचा करार केला, तेव्हा करारात पाकिस्तान आणि भारताशी संबंधित सामने समाविष्ट होते, ज्याच्या आधारे प्रसारकाने आयसीसीला पैसे दिले," सूत्राने सांगितले. विश्वसनीय सूत्रांनी सांगितले की पीसीबीने या प्रकरणात समर्थनासाठी इतर सदस्य मंडळांशी संपर्क साधला, परंतु त्यांना कोणताही पाठिंबा मिळाला नाही." भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 15 फेब्रुवारी रोजी रंगणार आहे.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Maharashtra Times

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

टी-20 सामन्यावर बहिष्कार टाकल्याप्रकरणी पाकिस्तानवर कायदेशीर कारवाई करण्याची आयसीसीची धमकी | Achira News