यवतमाळ:जिल्ह्यातील टिपेश्वर वन्यजीव अभयारण्यात पर्यटकांना मंगळवारी सकाळीवाघीणीसहबछड्याचे दर्शन झाल्याने सफारीचा अनुभव अविस्मरणीय ठरला. उन्हाळी सुट्ट्यांमुळे आधीच गर्दी असताना, अचानक समोर आलेल्या या जोडीने काही क्षणांसाठी जंगलात रोमांचक वातावरण निर्माण केले. सफारीदरम्यान मुक्तपणे फिरणारीवाघीणआणि तिचा बछडा दिसत पर्यटकांनी आनंद व्यक्त करत हा खास क्षण कॅमेऱ्यात कैद केला. काही क्षणांसाठी सर्वत्र शांतता पसरली होती, तर पुढच्याच क्षणी उत्साहाची लाट उसळली. उन्हाळ्याच्या दिवसांत पाण्याच्या शोधात वन्यप्राणी जलस्रोतांच्या दिशेने वळत असल्याने अशा दर्शनांच्या घटना वाढत असल्याचे वनविभागाने सांगितले. दरम्यान, पर्यटकांनी जंगलातील नियमांचे पालन करून सुरक्षित अंतर राखणे अत्यावश्यक असल्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
टिपेश्वर वन्यजीव अभयारण्यात वन्य डुक्कर पाहून पर्यटकांना आनंद
Lokmat•

Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.