Achira News Logo
Achira News

टॉलीवूडची पॉवर कपल रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा लग्नबंधनात अडकणार

Lokmat
टॉलीवूडची पॉवर कपल रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा लग्नबंधनात अडकणार
Full News
Share:

रश्मिका मंदानाआणि विजय देवराकोंडा लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी साखरपुडा केल्याच्या चर्चा वाऱ्यासारख्या पसरल्या होत्या. पण, रश्मिका किंवा विजय यांनी याबाबत अद्याप कोणतीही घोषणा केली नाही. साखरपुड्यानंतर रश्मिका आणि विजय फेब्रुवारी महिन्यात लग्न करणार असल्याचं बोललं जात होतं. आता लवकरच ते दोघेही लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. उदयपूरमध्ये रश्मिका-विजयचा शाही विवाहसोहळा पार पडणार असून त्याची जय्यत तयारीही सुरू आहे. इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. यामध्ये दोन मुली दिसत आहेत. रश्मिका-विजयचं लग्न ज्या ठिकाणी होणार आहे तिथेच असल्याचा दावा या मुलींनी केला आहे. उदयपूरमधील सिटी पॅलेसमध्ये रश्मिका-विजय सप्तपदी घेणार आहेत. त्याच सिटी पॅलेसमधील हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओत सिटी पॅलेसमध्ये लग्नाची जय्यत तयारी सुरू असल्याचं दिसत आहे. रश्मिका-विजय येत्या २ फेब्रुवारीला लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचं या व्हिडीओतून सांगण्यात आलं आहे. पण, अद्याप रश्मिका-विजयकडून याबाबत कोणीतीही माहिती देण्यात आलेली नाही. रश्मिका आणि विजय गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात त्यांनी गुपचूप साखरपुडा केला. याबाबत रश्मिकाने हिंटही दिली होती. मात्र त्यांनी अद्याप त्यांचं नातं ऑफिशियल केलेलं नाही. साखरपुड्याप्रमाणेच ते दोघे लग्नही गुपचूप करणार असल्याची माहिती आहे. रश्मिका आणि विजयच्या लग्नात मोजक्याच पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आलं आहे.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

टॉलीवूडची पॉवर कपल रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा लग्नबंधनात अडकणार | Achira News