Achira News Logo
Achira News

ठाणे महानगरपालिकेने नवीन महापौर आणि उपमहापौरांची निवड केली

Maharashtra Times
ठाणे महानगरपालिकेने नवीन महापौर आणि उपमहापौरांची निवड केली
Full News
Share:

विनित जांगळे, ठाणे :ठाणे महानगरपालिकेच्या महापौरपदी शिवसेनेच्या शर्मिला रोहित पिंपळोलकर (गायकवाड) यांची, तर उपमहापौरपदी भाजपच्या कृष्णा दादू पाटील यांची मंगळवारी निवड झाली. या दोन्ही पदांची निवडणूक पिठासीन अधिकारी तथा ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. ठाण्याच्या महापौरपदी शिवसेनेच्या शर्मिला पिंपळोलकर यांची आणि उपमहापौरपदी भाजपच्या कृष्णा पाटील यांची निवड झाल्याची अधिकृत घोषणा पीठासीन अधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी करताच पालिकेच्या सभागृहात युतीचे नगरसेवक व नगरसेविकांनी शिवसेना, भाजप, रिपाईं महायुतीचा विजय असो, अशा घोषणा देत जल्लोष केला.ठाणे महानगरपालिकेच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात मंगळवारी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला पिठासीन अधिकारी म्हणून ठाण्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ तसेच महापालिका सचिव मनीष जोशी उपस्थित होते. या सभेत महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक पार पडली. या दोन्ही पदांसाठी विरोधी पक्षाकडून एकही अर्ज दाखल करण्यात आला नव्हता. त्यामुळे महापौरपदासाठी शिवसेनेकडून अर्ज दाखल केलेल्या शर्मिला पिंपळोलकर यांची आणि उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल केले.भाजपच्या कृष्णा पाटील यांची बिनविरोध निवड पिठासीन अधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी केली. महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडीची घोषणा झाल्यानंतर ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी नवनिर्वाचित महापौर शर्मिला पिंपळोलकर आणि उपमहापौर कृष्णा पाटील यांचे तुळशीचे रोप देऊन अभिनंदन आणि स्वागत केले.भगवे फेटे, उपरणे...तुतारीचा गजरशिवसेना आणि भाजप युतीच्या नवनिर्वाचित नगरसेवकांनी भगवे फेटे आणि उपरणे परिधान करत पालिका सभागृहात प्रवेश केला. यावेळीमहापौरआणि उपमहापौरांची निवड होताच तुतारीच्या गजरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. एकमेकांना मिठाई देत तोंड गोड करुन या निवडीचे उपस्थितांनी स्वागत केले.महापौरांचा अल्पपरिचयनाव : शर्मिला रोहित पिंपळोलकर (गायकवाड)पत्ता : कोपरी कॉलनी, सिध्दार्थ नगर, ठाणेजन्म : २५ जानेवारी १९८२शैक्षणिक पात्रता : सध्या कलाशाखेच्या दुसऱ्या वर्गात शिकत आहे. बारावी व दहावी (मुंबई विद्यापीठ)राजकीय कारकीर्द : शिवसेना नगरसेविका २०१७ ते २०२२ आणि २०२६ (प्रभाग क्र. २०)नौपाडा कोपरी प्रभाग समिती अध्यक्ष २०१७ ते २०१९ठाणे महानगर पालिका शिक्षण समिती सदस्य २०२१ ते २०२२कोरोना योद्धा पुरस्कार २०२१ ते २०२२उत्कृष्ट नगरसेविका पुरस्कार २०२५महापौरपदी निवड झाल्यानंतर शर्मिला पिंपळोलकर यांची प्रतिक्रिया"यंदा माझी नगरसेवक पदाची दुसरी टर्म असून गेली आठ वर्षे नगरसेवक म्हणून काम केल्यानंतर यंदा महापौरपदाची संधीशिवसेनामुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मिळाल्याचा आनंद आहे. मी या पदाला न्याय देण्याचा प्रयत्न करेन. 'ठाणे शहर' आनंद दिघे यांचा बालेकिल्ला आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी ही ओळख कायम ठेवली असून येत्या काळात ठाणे शहर सुंदर, स्वच्छ करण्याकडे भर असेल", अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी दिली.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Maharashtra Times

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

ठाणे महानगरपालिकेने नवीन महापौर आणि उपमहापौरांची निवड केली | Achira News