तासन् तास लॅपटॉप किंवा मोबाईलसमोर बसल्याने डोळ्यांचे विकार, पाठदुखी आणि मानसिक थकवा येऊ शकतो. त्यामुळे अभ्यासाच्या दरम्यान बेक घेणे आवश्यक आहे. सायबर सुरक्षेचे नियम पाळावेत. केवळ डिजिटल जगात न रमता प्रत्यक्ष सामाजिक संवाद आणि मैदानी खेळ खेळणे आरोग्यासाठी आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी गरजेचे आहे. शिक्षणासाठी घेतलेला मोबाईल कधी सोशल मीडिया आणि गेमिंगच्या व्यसनाकडे नेतो, हे कळत नाही. त्यामुळे स्वतःवर ताबा असणे महत्त्वाचे आहे. डिजिटल शिक्षणाचा पाया ‘वीज’ हा आहे. आजही भारतातील अनेक खेड्यांत अनेक तास वीज नसते. त्यामुळे ऑनलाईन क्लास सुरू असताना मध्येच बंद पडणे किंवा तांत्रिक अडचणी येतात. डोंगराळ आणि ग््राामीण भागात साधी ‘2जी’ची रेंज मिळणेही कठीण आहे. ‘बफरिंग’ आणि ‘नेटवर्क एरर’मुळे शैक्षणिक नुकसान होत आहे. एका बाजूला श्रीमंत मुलांकडे स्वतःचे लॅपटॉप आणि हायस्पीड बॉडबँड आहे, तर दुसरीकडे संपूर्ण घरासाठी एकच साधा स्मार्ट फोन असलेली कुटुंबे आहेत. ही आर्थिक दरी समाजाला ‘डिजिटल सधन’ आणि ‘डिजिटल वंचित’ अशा दोन गटांत विभाजत आहे.
डिजिटल विभाजनः ऑनलाईन शिक्षणाची काळी बाजू
Pudhari•

Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.