Achira News Logo
Achira News

तेंडुलकर कुटुंबाचा वादः आयपीएल सामन्यात अर्जुनने घेतला सचिनचा वारसा स्वीकारला

Lokmat
तेंडुलकर कुटुंबाचा वादः आयपीएल सामन्यात अर्जुनने घेतला सचिनचा वारसा स्वीकारला
Full News
Share:

Sachin Tendulkar vs Arjun Tendulkar : मुंबईतील वानखेडे स्टेडियमवरमुंबई इंडियन्सआणि लखनौ सुपर जाएंट्स यांच्यात आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील ४७ वा सामना रंगणार आहे. गुणतालिकेत तळाशी असलेल्या या दोन्ही संघांच्या लढतीत एक ऐतिहासिक क्षण पाहायला मिळणार आहे. IPL इतिहासात पहिल्यांदाच बाप-लेकांच्या संघात आमनेसामने टक्कर होणार आहे. 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! सचिन तेंडुलकरविरुद्धअर्जुन तेंडुलकरअशी लढत मुंबई इंडियन्सआणि लखनौ सुपर जाएंट्स यांच्यातील लढतीला मास्टर ब्लास्टरसचिन तेंडुलकरविरुद्धअर्जुन तेंडुलकरअसे स्वरुप आले आहे. २०२५ च्या हंगामापर्यंत सचिन तेंडुलकर आणि अर्जुन तेंडुलकर ही बाप लेकाची जोडी मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात होती. पण यंदाच्या हंगामाआधी ट्रेडच्या माध्यमातून अर्जुन तेंडुलकर लखनौच्या ताफ्यात सामील झाला. त्यामुळेच आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच बाप लेकांचे संघ एकमेकांविरुद्ध खेळतानाचा खास क्षण अनुभवायला मिळणार आहे. 'खुल्लम खुल्ला प्यार' आता बंद! 'गर्लफ्रेंड कल्चर' BCCIला अमान्य, 'हे' ४ भारतीय काय करणार? अर्जुन तेंडुलकरला नव्या संघाकडून पदार्पणाची संधी मिळणार? आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून सचिन तेंडुलकर मुंबई इंडियन्ससोबत आहे. सुरुवातीच्या काळात MI संघाचे नेतृत्व केल्यावर सध्याच्या घडीला सचिन तेंडुलकर मुंबई इंडियन्सचा मेंटॉर आहे. दुसरीकडे अर्जुन तेंडुलकर लखनौच्या संघाकडून पदार्पणाच्या प्रतीक्षेत आहे. त्याच्या पदार्पणाच्या संधीसह हा सामना आणखी खास ठरणार का? ते पाहण्याजोगे असेल. अर्जुन तेंडुलकरनं २०२३ मध्ये MI च्या संघाकडून पदार्पण केले होते. आतापर्यंत त्याने फक्त ५ सामने खेळले असून यात त्याने ३ विकेट्स घेतल्या आहेत. MI सह LSG तळाला! आयपीएलच्या यंदाच्या हंगामात पाच वेळच्या मुंबई इंडियन्ससह लखनौ सुपर जाएंट्सची अवस्था बिकट आहे. ९ सामन्यानंतर मुंबई इंडियन्सचा संघ फक्त २ विजयासह ४ गुणांची कमाई करून नवव्या स्थानावर आहे. दुसऱ्या बाजूला ८ सामन्यानंतर लखनौचा संघ २ विजयासह सर्वात तळाला आहे. लखनौचा संघ उर्वरित पाच सामने जिंकून अजूनही स्वबळावर प्लेऑफ्स गाठू शकतो. दुसरीकडे MI ला सर्व सामने जिंकले तरी अन्य संघांच्या निकालावर अवलंबून रहावे लागणार आहे.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

तेंडुलकर कुटुंबाचा वादः आयपीएल सामन्यात अर्जुनने घेतला सचिनचा वारसा स्वीकारला | Achira News