Achira News Logo
Achira News

तंत्र-मंत्र आणि अघोरी कायद्यांच्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांवर शिवसेना नेत्याचा आरोप

Lokmat
तंत्र-मंत्र आणि अघोरी कायद्यांच्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांवर शिवसेना नेत्याचा आरोप
Full News
Share:

Sushma Andhare On Rupali Chakankar Ashok Kharat Case:कॅप्टनअशोक खरातबलात्कार प्रकरणामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडालेली आहे. आता या प्रकरणात समोर आलेल्या एका खुलाशामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. शिवसेना (ठाकरे गट) नेत्यासुषमा अंधारेयांनी थेट राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षारुपाली चाकणकरयांच्यावर तंत्र-मंत्र आणि अघोरी कृत्यांमध्ये सामील असल्याचा गंभीर आरोप केला आहे. 'त्या' बोटाला बँडेज कशासाठी? अंधारेंनी दाखवले फोटो सुषमा अंधारेयांनी पत्रकार परिषदेतरुपाली चाकणकरयांचे काही फोटो दाखवे, ज्यात त्यांच्या हाताच्या अनामिका (रिंग फिंगर) बोटाला बँडेज बांधलेले दिसत आहे. अंधारे यांच्या दाव्यानुसार, चाकणकर या स्वतः अघोरी विद्या करतात. एका पीडितेचा हवाला देत अंधारे यांनी सोमवती अमावस्येला रुपाली चाकणकर यांनी अघोरी विद्या केल्याचा आरोप केला. काय आहे 'अनामिका' कापण्यामागचे गूढ? "रुपाली चाकणकरांनी सुरुवातीला सांगितले की आमचा काही संबंध नाही. पण खरातच्या घरगुती कार्यांमध्ये चाकणकर होत्या. खरात आणि चाकणकर यांचे आर्थिक संबंध आहेत. एका पीडितेने सांगितले की, रुपाली चाकणकर या स्वतःत तंत्र मंत्र करायच्या. त्यांनी अक्षरक्षः अनामिका (रिंग फिंगर) कापली. हे काय प्रकरण आहे हे कळलं नसल्याने मी याची माहिती काढली. तंत्र मंत्र विद्येमध्ये अनामिका महत्त्वाची असते. कारण ती सूर्य आणि सूर्य आणि शुक्र ग्रहपासून ऊर्जा वहनासाठी मुख्य केंद्र आहे. या बोटाचा वापर प्रामुख्याने मंत्राचा प्रभाव वाढवण्यासाठी, विशिष्ट मुद्रा करण्यासाठी किंवा एखाद्या व्यक्तीला वश करण्यासाठी केला जातो. या बोटाद्वारे ऊर्जा शरीरात प्रवाहित किंवा शोषित केली जाऊ शकते. तंत्रमंत्र विद्येच्याच लोकांनी सांगितल्यानुसार हे बोट सूर्य म्हणजे यश आणि शुक्र याच्याशी जोडलेले आहे. ज्यामुळे मंत्रोच्चाराद्वारे एखाद्याला आकर्षित करणे आणि यश प्राप्त करणे असा हा या विद्येचा अर्थ आहे," असा खुलासा सुषमा अंधारे यांनी केला. "त्यांनी सांगितले की हे सोमवती अमावस्येला करतात. १२ सप्टेंबर २०२४ च्या फोटोमध्ये चाकणकरांच्या अनामिकेला मोठं बँडेज दिसत आहे. ९ सप्टेंबरच्या फोटोतही त्या एका कार्यक्रमात बोलताना दिसतात जिथंही बँडेज दिसतं. मग हे सगळं शोधल्यावर लक्षात आलं की २ सप्टेंबर २०२४ ला सोमवती अमावस्या होती. ज्या बाईंना महिला आयोगाच्या अध्यक्षपदी बसवलं आहे त्या बाई सोमवती अमावस्येच्या दिवशी स्वत:ची अनामिका कापून अशा प्रकारची तंत्रमंत्र करतात असं पीडित महिलेला सांगतात, ही जखम किती मोठी असू शकते याचा अंदाज फोटो पाहून लक्षात येतं, असंही सुषमा अंधारे म्हणाल्या. भोंदू बाबाशी लागेबांधे? कॅप्टनअशोक खरातचालवत असलेल्या संस्थेत रुपाली चाकणकर या केवळ सदस्यच नव्हत्या, तर त्या खरातच्या समोर अक्षरशः लोटांगण घालत होत्या, असा दावाही अंधारेंकडून करण्यात आला . "एकीकडे महिलांच्या हक्कासाठी लढणारे घटनात्मक पद आणि दुसरीकडे अघोरी विद्येचा वापर, हे महाराष्ट्रासाठी घातक आहे," असेही अंधारे म्हणाल्या.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

तंत्र-मंत्र आणि अघोरी कायद्यांच्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांवर शिवसेना नेत्याचा आरोप | Achira News