छत्रपती संभाजीनगर:भाजप नेत्या आणि राज्याच्या पर्यावरण मंत्रीपंकजा मुंडेयांच्या हेलिकॉप्टरला आजछत्रपती संभाजीनगरविमानतळावर तांत्रिक बिघाड झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुदैवाने, उड्डाण घेण्यापूर्वीच हा बिघाड वैमानिकाच्या लक्षात आल्याने एक मोठी दुर्घटना टळली आहे. या घटनेमुळे समर्थकांमध्ये काही काळ चिंतेचे वातावरण पसरले होते. पंकजा मुंडेसध्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी मराठवाडा दौऱ्यावर आहेत. आज लातूर जिल्ह्यात त्यांच्या झंझावाती प्रचार सभांचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती संभाजीनगर येथून लातूरकडे झेपावण्याच्या तयारीत असतानाच हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड असल्याचे निष्पन्न झाले. सुरक्षेच्या कारणास्तव वैमानिकाने तात्काळ उड्डाण रद्द करण्याचा निर्णय घेतला. जिद्द कायम, कार्यक्रम लांबणीवरया तांत्रिक बिघाडामुळे पंकजा मुंडे यांच्या लातूरमधील सभांच्या वेळेत काहीसा बदल झाला आहे. मात्र, कार्यकर्त्यांची निराशा होऊ नये म्हणून त्यांनी तातडीने पर्यायी व्यवस्था केली असून, त्या लातूरकडे रवाना होणार आहेत. "नियोजित कार्यक्रमांना थोडा उशीर झाला असला, तरी सर्व सभांना उपस्थित राहणार," असा संदेश त्यांच्या कार्यालयाकडून देण्यात आला आहे. मुंडे सुरक्षित असल्याची खात्री पटताच राज्यभरातील त्यांच्या कार्यकर्त्यांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.
तांत्रिक बिघाडामुळे पंकज मुंडेंच्या हेलिकॉप्टरचे उड्डाण, पर्यायी व्यवस्थेसह मोहीम दौरा पुन्हा सुरू
Lokmat•
Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.