Pankaja Munde Helicopter Technical Glitch :राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्याने त्यांचे उड्डाण काही काळ रखडले होते. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीकरता त्यांचा दौरा नियोजित करण्यात आला होता. मात्र, या तांत्रिक बिघाडामुळे त्यांच्या दौऱ्याला दोन तास उशीर झाला आहे. दरम्यान, या घटनेनंतर पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सोमवारीपंकजा मुंडेया छत्रपती संभाजीनगरमध्ये मुक्कामी होत्या. मंगळवारी सकाळी पंकजा मुंडे यालातूर,धाराशिव व सोलापूर या तीन जिल्ह्यातील त्यांच्या नियोजित सभांसाठी हेलिकॉप्टरने छत्रपती संभाजीनगर येथील चिकलठाणा विमानतळावरून निघण्याच्या तयारीत होत्या. पण विमानात तांत्रिक बिघाड झाला. याबाबत त्या म्हणाल्या, “सकाळी साडेदहा वाजता मी निघणार होते. पण मला कळवण्यात आलं की काल जे हेलिकॉप्टर होतं त्यात बिघाड झाला आहे. ते हेलिकॉप्टर मला जरा जुनंही वाटत होतं. त्यात काय बिघाड आहे हे माहीत नाही. त्यामुळे दुसरं हेलिकॉप्टर पाठवणार असल्याचं त्यांनी सांगितलं. सभा रद्द करण्यात आलेली नाही. लोक वाट बघायला तयार आहेत. ही कार्यकर्त्यांचीनिवडणूकआहे, त्यामुळे त्यांच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे.” “माझी आई लँड झाली का? टेकऑफ झाली का विचारत असते. एवढी मोठी दुर्घटना झाली आहे की सर्वांची मने हादरली आहेत, टेन्शन लोकांच्या मनात आहे. अनेक लोक मेसेज करत होते की हेलिकॉप्टरमध्ये बसू नका. पण याशिवाय पर्याय नाही, कारण आम्हाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं आहे. काही काळजी करायचं कारण नाही. काम तर चालत राहणार. काहीही झालं तरी दौरा रद्द होणार नाही”, असंही त्या पुढे म्हणाल्या. “जेव्हापासून अजित दादांचा अपघात झालाय, तेव्हापासून मी क्षणोक्षणी विचार करतेय की विमानातील लोकांना अपघातावेळी काय वाटलं असेल? आमच्या घरात सर्व व्यथित आहोत. महाराष्ट्रात सर्वांच्या घरात हेच चित्र असेल”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
तांत्रिक बिघाडामुळे पंकज मुंडेंच्या हेलिकॉप्टरला उशीर
Loksatta•

Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Loksatta
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.