Achira News Logo
Achira News

तंबाखूची घातक पकडः कर्करोगास कारणीभूत असलेल्या जीवनशैलीच्या सवयींविरुद्ध कारवाई करण्याचे आवाहन

Pudhari
तंबाखूची घातक पकडः कर्करोगास कारणीभूत असलेल्या जीवनशैलीच्या सवयींविरुद्ध कारवाई करण्याचे आवाहन
Full News
Share:

कॅन्सरने मरणाऱ्यांपैकी 43 टक्के रुग्ण हे तंबाखू खाण्याने कर्करोग होऊन मरत असतात. जगातच तंबाखूच्या वापराबाबत वारंवार इशारे दिले जात असतात. लोकांना त्यातला धोका कळावा म्हणून तंबाखू दिन साजरा करून त्या दिवशी लोकांना तंबाखूचे दुष्परिणाम समजावून सांगितले जात असतात; पण तंबाखूवर पूर्णपणे बंदी घालण्याचा प्रयत्न मात्र कोणीही करीत नाही. वास्तविक, बदलत्या जीवनशैलीने कर्करोग वाढत आहे असे केवळ म्हणून चालणार नाही, तर या जीवनशैलीतल्या कोणत्या गोष्टी अनुचित आहेत, याची अचूक माहिती दिली गेली पाहिजे. नागरिकांनी जीवनशैली बदलण्याची गरज आहे. खाण्यापिण्याच्या अनेक पातळ्यांवर बदल करावे लागणार आहेत. सध्या जगात जास्तीत जास्त धान्य पिकवण्याची स्पर्धा सुरू आहे आणि या स्पर्धेतून शेतावर रासायनिक खतांचा मारा केला जात आहे. पिकांवर रोग पडले की, एकापेक्षा एक विषारी जंतुनाशके मारली जाताहेत; पण त्यांचे अंश पिकांत उतरतात आणि खाण्यातून शरीरात जातात. कर्करोग होण्याचे हेही एक कारण आहे. पंजाबच्या भटिंडा जिल्ह्यात कर्करोगाचे प्रमाण फार मोठे आहे. त्याची कारणे शोधली असता पिकांवर मारली जाणारी कीटकनाशके त्याला कारणीभूत असल्याचे आढळले; पण याबाबत म्हणावी तेवढी जागृती केली जात नाही.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

तंबाखूची घातक पकडः कर्करोगास कारणीभूत असलेल्या जीवनशैलीच्या सवयींविरुद्ध कारवाई करण्याचे आवाहन | Achira News