Achira News Logo
Achira News

तुमच्या चहाच्या फिल्टरचे पुनरुज्जीवन कराः साचलेली घाण काढून टाकण्याची एक सोपी युक्ती

Maharashtra Times
तुमच्या चहाच्या फिल्टरचे पुनरुज्जीवन कराः साचलेली घाण काढून टाकण्याची एक सोपी युक्ती
Full News
Share:

घरात चहा करणे ही बहुतेकांची रोजची सवय असते. सकाळची सुरुवात असो किंवा दमलेल्या संध्याकाळी थोडा विरंगुळा हवा असो, चहाचा कप नेहमीच सोबत असतो. पण रोजच्या वापरामुळे चहाच्या गाळणीवर हळूहळू काळसर थर आणि मळ साचू लागतो. सुरुवातीला हा मळ फारसा जाणवत नाही; मात्र वेळ जसजसा जातो तसतशी गाळणीतील बारीक छिद्रे अडकतात.त्यामुळे चहा नीट गाळला जात नाही आणि कधी कधी चहाची पाने थेट कपात जातात.या त्रासाला कंटाळून अनेक जण नवीन गाळणी आणतात, पण प्रत्यक्षात जुनी गाळणी स्वच्छ करणे खूपच सोपे असते. योग्य उपाय वापरल्यास साचलेली घाण काही मिनिटांत सहज निघून जाते. या गोष्टीसाठी फार गोष्टी लागत नाही. तर काही सोप्या गोष्टींचा वापर करून तुम्ही या समस्येवर मात मिळवू शकता. (फोटो सौजन्य :- @masterchefpankajbhadouria)चहाच्या गाळणीवर घाण का जमा होते?चहाच्या गाळणीवर मळ साचण्यामागे चहाच्या पानांतील नैसर्गिक रंगद्रव्ये आणि तेले कारणीभूत असतात. चहा गाळताना ही द्रव्ये हळूहळू गाळणीला चिकटतात. केवळ पाण्याने वारंवार धुतल्याने हे डाग पूर्णपणे निघत नाहीत आणि जसजसा काळ जातो तसतशी गाळणीतील छिद्रे अडकू लागतात. परिणामी गाळणी जुनी, काळसर आणि अस्वच्छ दिसू लागते.हे मिश्रण कसे तयार करायचेएका भांड्यात तीन ग्लास पाणी घ्या आणि ते गॅसवर गरम ठेवा. पाणी उकळायला लागल्यावर त्यात दोन चमचे व्हिनेगर, एक चमचा बेकिंग सोडा आणि थोडंसं डिशवॉश लिक्विड मिसळा. आता या उकळत्या पाण्यात चहाच्या गाळणीचा भाग टाका आणि साधारण दहा मिनिटे तसेच ठेवू द्या. त्यानंतर गाळणी बाहेर काढून जुन्या टूथब्रशने हलक्या हाताने घासा. पाहताच तुम्हाला जाणवेल की साचलेला मळ सहज निघून जातो आणि बंद झालेली छिद्रे पुन्हा मोकळी होतात. ही पद्धत स्टील तसेच प्लास्टिकच्या गाळणीसाठीही प्रभावी ठरते.गॅसवर हलके गरम करून स्वच्छ करा.ही पद्धत विशेषतः स्टील स्ट्रेनर्ससाठी प्रभावी आहे. स्ट्रेनर गॅसवर हलके गरम करा, जाळीची बाजू वरच्या दिशेने ठेवा. काही क्षणातच, चहाची पाने आणि घाण जळू लागेल आणि सैल होईल. गॅस बंद करा, स्ट्रेनर थंड होऊ द्या आणि स्क्रबरने हळूवारपणे स्वच्छ करा. नंतर, ते पाण्याने स्वच्छ धुवा. ही पद्धत कोणत्याही अडकलेल्या पाने आणि अडथळ्यांना सहजपणे काढून टाकते.लिंबू आणि मीठचा वापर कराजर तुमच्याकडे बेकिंग सोडा नसेल तर लिंबू आणि मीठ हा एक चांगला पर्याय आहे. गाळणीवर थोडे मीठ शिंपडा आणि त्यावर अर्धा लिंबू चोळा. काही मिनिटांनी पाण्याने स्वच्छ धुवा. यामुळे डाग हलके होतील आणि गाळणी स्वच्छ दिसेल.साफसफाई केल्यानंतर या गोष्टी लक्षात ठेवावापर झाल्यावर लगेचच गाळणी स्वच्छ पाण्याने धुवा, त्यामुळे चहाचा रंग आणि तेल साचत नाही.आठवड्यातून किमान एकदा बेकिंग सोडा किंवा व्हिनेगर वापरून खोलवर स्वच्छता करा.गाळणी धुतल्यानंतर ती पूर्णपणे कोरडी करा आणि मगच साठवून ठेवा.ओलसर गाळणी बंद डब्यात ठेवल्यास दुर्गंधी आणि बुरशी तयार होऊ शकते, त्यामुळे टाळा.गाळणीसाठी वेगळी मऊ ब्रश किंवा टूथब्रश वापरा, त्यामुळे छिद्रे खराब होत नाहीत.फार कडक स्क्रबर किंवा धारदार वस्तू वापरणे टाळा, यामुळे गाळणीला ओरखडे पडू शकतात.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Maharashtra Times

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

तुमच्या चहाच्या फिल्टरचे पुनरुज्जीवन कराः साचलेली घाण काढून टाकण्याची एक सोपी युक्ती | Achira News