Achira News Logo
Achira News

तामिळनाडूच्या निवडणुकीत थलपती विजयच्या भविष्यातील यशाचा चित्रपट अंदाज वर्तवतो

Maharashtra Times
तामिळनाडूच्या निवडणुकीत थलपती विजयच्या भविष्यातील यशाचा चित्रपट अंदाज वर्तवतो
Full News
Share:

मुंबई -दिग्दर्शक व्यंकट प्रभू सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहेत. याचं कारण म्हणजे, चाहत्यांनी त्यांच्या 'The Greatest of All Time' या चित्रपटातील एका रंजक गोष्टीनं लक्ष वेधलं आहे. थलपती विजयच्या निवडणुकीतील प्रचंड यशानंतर, चाहत्यांनी या चित्रपटातील सीन्स आणि फुटेज पुन्हा एकदा पाहण्यास सुरुवात केली. चित्रपटातील एका सीननं आता सर्वांचं लक्ष वेधलं आहे.Thalapathy Vijay : विजयच्या TVKला अभूतपूर्व यश, DMKला हरवत तमिळनाडूत थलपती सरकार, सुपरस्टार CM होणार२०२४ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'GOAT' या चित्रपटात,विजयच्यागाडीची नंबर प्लेट 'TN07 CM2026' अशी दाखवण्यात आली होती. आता चाहते सिनेमातील या सीनला दिग्दर्शक व्यंकट प्रभू यांनी केलेली एक भविष्यवाणी म्हणत आहेत. अनेक वर्षांपूर्वीच विजयच्या भविष्याबद्दल संकेत दिल्याबद्दल, चित्रपट दिग्दर्शकाचं कौतुक सोशल मीडियावर होत आहे.Prajakta Mali : 'लग्नाचं प्रेशर कसं हाताळतेस?' प्राजक्ता माळीला चाहत्याचा प्रश्न; अभिनेत्री म्हणाली, 'जे होतं ते चांगल्यासाठी...''GOAT' सिनेमातील गाडीच्या नंबर प्लेटमुळे चाहत्यांमध्ये चर्चा'GOAT'सिनेमातदाखवण्यात आलेला गाडीचा क्रमांक हा सोशल मीडियावर चर्चेचा सर्वात मोठा विषय ठरला आहे. 'CM2026' हा गाडीचा नंबर आता विजयच्या यशाला पूर्णपणे साजेसा आहे. त्यामुळे 'GOAT' या सिनेमातील सीन सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विजयच्या अनेक चाहत्यांनी चित्रपटातील स्क्रीनशॉट्स शेअर करण्यास सुरुवात असून सिनेमा तो गाडीचा नंबर दाखवल्याबद्दल व्यंकट प्रभू यांचं कौतुक केलं आहे. काही चाहत्यांनी तर गंमतीने त्यांना 'भविष्य वर्तवणारा' दिग्दर्शकही म्हटलंय.View this post on InstagramA post shared by Behindwoods (@behindwoodsofficial)व्यंकट प्रभू यांनी विजयसोबतचा एक जुना फोटो शेअर केलाव्यंकट प्रभू यांनी 'GOAT'सिनेमाच्या शुटिंगच्याठिकाणचा, विजयसोबतचा एक जुना फोटो शेअर केला. त्यांनी 'GOAT' चा एक छोटा व्हिडिओ देखील पोस्ट केला.View this post on InstagramA post shared by Venkat Prabhu (@venkat_prabhu)दरम्यान, २०२६ च्या तामिळनाडू निवडणुकीचे निकाल सोमवारी जाहीर झाले असून तामिळ सुपरस्टार विजयचा पक्ष, टीव्हीकेनं, १०८ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष म्हणून स्थान मिळवलं आहे. विजयच्या दणदणीत विजयामुळे तामिळनाडूतील सत्ताधारी पक्ष असलेल्या डीएमकेला सर्वात मोठा धक्का बसला आहे. मागील निवडणुकीत डीएमकेनं १३३ जागा जिंकल्या होत्या. मात्र, यावेळी त्यांना ७४ जागा गमवाव्या लागल्या.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Maharashtra Times

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

तामिळनाडूच्या निवडणुकीत थलपती विजयच्या भविष्यातील यशाचा चित्रपट अंदाज वर्तवतो | Achira News